Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.
प्रकरण १ लें.
दरबारी * न्याय.

 मनुष्यास हरवक्त आपल्या तंट्या बखेड्याचा निका- ल दरवारी न्यायानुसार करून ध्यावा लागतो आणि सांप्रत तर दरबारीन्यायावांचून कोणत्याही गोष्टी- ची तडजोड करूं नयेच अशी सर्व लोकांत समज झाली आहे; परंतु दरबारी न्याय मिळविण्यास अनु- कूळ असाव्या अशा ज्या कांहीं गोष्टी आहेत त्यां- कडे फारसे कोणाचें लक्ष्य जात नाहीं आणि ह्मणून त्या दरबारी न्यायाचे पाय कित्येक लोक भिकेस लागत चालले आहेत, यास्तव ज्यांस दरवारी न्याय पाहिजे असेल त्यांनी खालीं लिहिलेल्या मुख्य चार गो- 'ष्टींची तरी निदान आपणास अनुकूलता आहे किंवा कसें हैं पहावें व नसल्यास दरवारचें तोंड न पाहतां अन्य तऱ्हेनें आपल्या भानगडीचा निकाल करून घ्यावा. असें झाल्यानें हल्लीं या दरवारी न्यायाचे सं- बंधानें होत असलेले भयंकर परिणाम पुष्कळ अंशी टळण्याचा संभव आहे ! !


 * दरबारी न्याय करून घेऊं नयेच, असें कांहीं आमचें ह्मण- णें नाहीं परंतु तो योग्य प्रसंगाखेरीज हरवक्त मिळविण्याचे भरी स कोणी निदान गरिबांनी तरी पडूं नये.