Jump to content

पान:खानदेश मित्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रंजन आणि सुबोध.

 दरबारी न्यायाचे संबंधानें मुख्य मुद्याच्या चार

गोष्टी प्रथम पहावयाच्या त्या.

 १ ( मानसिक धैर्य ) २ (द्रव्यसामर्थ्य) ३ (स्वपक्ष- पुष्ट पुरावा ) ४ सत्यावर निष्ठा.
 आतां प्रत्येक मुद्याचें स्वरूप सांगतों आणि त्यांत प्रथम मानसिक धैर्य कां असावें आणि तें नसले तर कोणकोणते तोटे व्हावयाचे ह्याचा विचार करूं.
 २ मानसिक धैर्य — तुह्मीच विचार करून पहा की, आपणास एखादे कृत्य करावयाचें आहे व आ- पणास त्या कृत्यास लागणारा सरंजाम सर्व कांहीं अनुकूल आहे परंतु जर मानसिक धैर्य नाहीं तर तें कृत्य केव्हां तरी आपण सिद्ध करूं शकूं काय ? फार दूर कशाला आपण रानांत फिरत आहों व आ- पणाजवळ हत्यार आहे, परंतु शत्रूवर धांवून जाण्याची किंवा तो अंगावर धांवून आला असतां त्यास हरवि- ण्याची आपणास हिम्मत नसली तर त्या हत्याराचा कांहीं उपयोग होईल बरें? नाहीं. ह्मणून हरएक गो- टीत आपणास यश प्राप्त होण्यास प्रथम मानसिक धैर्यच असले पाहिजे ! व तें दरवारी न्यायांतही जरूर आहे.
 २ द्रव्य सामर्थ्य - प्रथमचें मानशिक धैर्य अ- स ह्मणजे मग ह्या दुसन्या द्रव्य सामर्थ्याची अवश्य जरूर आहे, मनुष्यमात्रांस जिवापेक्षांही ह्या लेकीं द्रव्य अधिक प्यारे आहे ! आपणांत एक साधारण झटलें आहे किं" चमडी जाय पण दमडी न जाय,, ह्या गीचा अंतरगामि अर्थ तरी असाच आहे कीं शरीरास इजा झाली तरी पुरवली पण द्रव्याचा एक