पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गुरुजींचं समग्र साहित्य हे प्रामुख्याने ८ ते १० वर्षांच्या मुलांसाठी मुलांसाठी लिहिलले आहे. मानसशास्त्रानुसार हे वय सर्वाधिक संस्कारशील असतं. स्पंज नि टीपकागदासारखं टिपणारं, आत्मसात करणारं! गुरुजी स्वतःच्या साहित्यास बाल साहित्यापेक्षा ‘शिशुसाहित्य' म्हणणं पसंत करतात. खांडेकर एकदा म्हणाले होते (खरं तर लिहिते झाले होते!) की, ‘आठ ते दहा वयोगटातील मुलांना शेवडे गुरुजींचं साहित्य दिले तर वेगळा संस्कार देण्याची गरज राहणार नाही. या अर्थाने शेवडे गुरुजी बालसाहित्यातील ‘संस्कारशील नंदादीप'च होत. नंदादीप अंधाच्या गाभा-यात जसा कोप-यात तेवत राहतो, तसं गुरुजींच्या लेखनातील सातत्याचं आहे. अद्भुतरम्यता, हास्यकारकता, कल्पनाचातुर्य, सहजता, अनुप्रासिकता ही गुरुजींच्या साहित्याच्या यशामागील वैशिष्ट्ये होत. पूर्वीच्या पिढीतील ज्या लोकांनी त्यांचं साहित्य वाचलं ते आपल्या मुला-नातवंडांना हटकून गुरुजींची पुस्तकं भेट देतात, यातच त्यांच्या साहित्याचे थारेपणं सामावलेलं दिसतं. त्याची एक गोष्ट सांगतो. मदर टेरेसांवरचं एक पुस्तक बाजारात आलं असं कळल्यावरून मी एका पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. विक्रेता पुस्तकशोधत होता. एक वृद्ध गृहस्थ दुकानात आले नि विचारते झाले, ‘शेवडे गुरुजींच्यापुस्तकांचा संच' केवढ्याला हो. दुकानदाराकडे त्याचं उत्तर नव्हतं. तो हतबल होऊन म्हणाला, सगळी पुस्तकं मिळण' अवघड आहे. उपलब्ध आहेत ती देतो. मागणी जास्त असते. ते ऐकून माझ्या मनात एक विचार आला. हिंदीमध्ये लेखकाचं समग्र साहित्य रचनावली'च्या रूपात येते. या धर्तीवर गुरुजींच्या कथासंग्रह, कादंबरिका, चरित्रे याचे संच यायला हवेत व ते घरोघरी जायला हवेत. ज्याना कुणाला आपली पुढची पिढी संस्कारशील व्हावी वाटते, त्यांनी या संदर्भात सक्रिय पुढाकार घ्यायला हवा. | शेवडे गुरुजींनी साहित्य लेखनाबरोबर साहित्य संघटनांकडेही लक्ष दिलं. कोल्हापुरात सक्रिय असलेल्या ‘बाल-कुमार साहित्य सभा'चे ते संस्थापक अध्यक्ष. इथं अनाथ, निराधार बालकांसाठी चालविण्यात येणाच्या बालकल्याण संकुलात त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ‘बाल साहित्य संमेलन भरविण्याचा प्रघात पाडला.

 औदुंबराच्या कवी संमेलनासारखा तो वर्धिष्णू होतो आहे. केवळ मोठ्यांनी लहानांसाठी लिहून चालणार नाही. बालवयातच लेखनाचे संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी मुलांची ‘लेखन शिबिरे योजली. त्यांच्या या उपक्रमाने आता चांगलं बाळसे धरलं आहे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८८