पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी बाल वाङ्मयात कथा, कादंबरिका, चरित्रे, नाटुकली, आठवणी इ. प्रकारच्या ८५ साहितयकृतींची भर घालणा-या अनेक पुरस्कार विजेत्या या साहित्यकारांनी महाराष्ट्राच्या गेल्या चार पिढ्यांना संस्कारशील केलं. गुरुजींमधील लेखकास कोकणाने आधार दिला. आजही गुरुजींचं कोणतंही पुस्तक प्रकाशित होवो कोकणातनू त्यास मोठी मागणी असते. देशावरील माणसांपेक्षा कोकणच्या माणसास आजही साहित्य, संस्कृतीचं वेड नि ओढ दिसते, त्याचं श्रये साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या पिढीनंतर शिक्षकी संस्कारांची बैठक घेऊन लिहिणाच्या शेवडे गुरुजींना द्यावे लागेल. गुरुजींच्या पंच्याऐंशी वर्षांच्या वाटचालीनं महाराष्ट्राला दिलेल्या या पाथेयाची नोंद साहित्याच्या इतिहासकारांनी घ्यायला हवी.
 शेवडे गुरुजींच्या समग्र जीवनात साहित्य म्हणजे 'वयो ज्यष्ठा, मनो युवा'च मूर्तिमंत उदाहरण. आपल्या मूल्यनिष्ठ जीवनाचा त्यांनी १९८९ ला ‘अमृत महोत्सव' पूर्ण केला, तेव्हा गुरुजींनी ७५ पुस्तकं पूर्ण केली होती. एकदा त्यांना विचारलं, 'गुरुजी एकूण किती पुस्तकं झाली?' ते उत्तरले, ‘वयाला जेवढी वर्ष पूर्ण झाली तेवढी.' गुरुजींनी सुमारे ३६ कथासंग्रह, ४२ कादंब-या, नाटकं, चरित्रे काही बालकविता असं चतुरस्र लेखन केलं. त्यांच्या लेखनास आजवर अनके छोटे-मोठे पुरसस्कार लाभले. ‘वि. स. खांडेकर : चरित्र आणि आठवणी' या संस्मरणपर साहित्यकृतीस महाराष्ट्र शासनाने ‘विनायक कोंडदेव ओक पुरस्कार देऊन गौरविलं. एस. एम. जोशींनी अपर्ण केलेल्या एका साहित्यकृतीस त्यांना ‘साने गुरुजी पुरस्कार'ही। मिळाला आहे.

 मादाम माँटेसरी, ताराबाई मोडक, गिजाभाऊ बधेका प्रभृती बालशिक्षण तज्ज्ञांच्या सहवास नि मार्गदर्शनाने गुरुजींमधील शिक्षक आकारला. 'साधी राहणी नि उच्च विचारसरणी' हा सर्रास वापरला जाणारा परंतु आचरणास कठीण असलेला ‘जीवनमत्रं' गुरुजी आजही ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा'च्या ध्यासाने जपताहेत. शेवडे गुरुजींच्या नावामागे लागलेली ‘गुरुजी' उपाधी स्वघोषित नव्हे. अलीकडे लोक स्वतःच ‘सम्राट' ‘आचार्य म्हणवून घेताना दिसतात. रा. वा. शेवड्यांचे ‘शेवडे गुरुजी' होणं हा समाजाने त्यांच्या रोजच्या आचरण, व्यवहारातील निरीक्षणानंतर वापरलेला वाक्यप्रचार होय. असं जनताजनार्दनाने दिलेलं मोठेपण नि तेही अत्यंत सहज, अकृत्रिमपणे निव्र्याज भावनेनं दिलेलं- फारच अपवादात्मक लोकांना लाभतं. यापेक्षा गुरुजींच्या जीवन व कार्याचा गौरव तो दुसरा कोणता असू शकतो?

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८७