पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 त्यातून बालकवींचा (त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‘बालकवी' नव्हे!) छोट्या कवि-कवयित्रींचा एक काव्यसंग्रह आकारतो यात शेवडे गुरुजींच्या दूरदृष्टीचं गमक लक्षात येतं !

 शेवडे गुरुजींनी संस्कार पेरणीच्या याच ध्यास नि ध्येयातून अनेक चरित्रग्रंथांची निर्मिती केली. धर्म समाजसेवा, साहित्य, काव्य, राजनीती, दशे सेवा इत्यादी क्षेत्रातील आदर्श धुंडाळून ते मुलांपुढे ठेवायचे व बालवयातच त्यांच्या भविष्यवेधी स्वप्नांची रुजवण करायची असं द्रष्ट नियाजे ने गुरुजींच्या लेखनामागे असतं हे चरित्रांच्या स्वरूप व रचनेवरून ध्यानात येते. चरित्रासारखं प्रेरक लेखन काही लेखक इतिवृत्तात्मकासारख्या रूक्ष नि रटाळ शैलीत का करतात असा प्रश्न नहे मीच माझ्या मनात येतो. गुरुजी या सर्व चरित्रांची कथात्मक बांधणी करतात व ती चरित्रे कादंबरीच्या रूपात सादर करतात. मुलं गुरुजींचे साहित्य हटकून का निवडतात, याचं रहस्य या रचना कौशल्यात सामावल्याचं दिसतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८९