पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या लेखनामागे ज्यांनी मला काही दिलं, त्यांच्या ऋणांतून उतराईची भावना आहे.
 स्वातंत्र्योत्तर काळात माझा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळ हा सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व अथारनी पुनरुज्जीवन व प्रबोधनाचा काळ होता. या काळात पंडिता रमाबाई, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रभृती समाज सुधारकांनी वंचित समाजासाठी दीपस्तंभासारखे कार्य केले. जातिप्रथा निर्मूलन, विधवा विवाह, बालहत्या प्रतिबंध, कुमारीमाता संरक्षण अन मुलं दत्तक घेणे हीकामे या समाजधुरिणांनी केली म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळातील वंचितांचे समाजजीवन सुसह्य होऊ शकले. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर राजर्षी शाहू महाराज, छ. राजाराम महाराज यांच्या कार्यकालात इथे अनेक सामजिक व शैक्षणिक कार्य करणाच्या संस्था व व्यक्तींना राजाश्रय लाभला. त्यातून शिक्षण संस्था, वसतिगृहे, अनाथाश्रम, रिमांड होम विकसित झाले.
 सन १९३७ साली इथे अनाथ हिंदू महिलाश्रम स्थापन झाला तेव्हा त्या संस्थेच्या विकास काळात ताराबाई महाराणीसाहेब, राजकुमारी पद्माराजे इ.नी देणग्या, जागा इ. देऊन साहाय्य केल्याच्या नोंदी संस्था दप्तरी आढळतात. त्या काळी समाज कार्य हे जाती व धर्माच्या प्रभावाखाली असले तरी काही दूरदर्शी मंडळी समाजास जाती-धर्माच्या बेड्या तोडून पुढे नेण्याचा प्रागतिक प्रयत्न करत होती. त्या वेळी हिंदू महासभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने वैज्ञानिक व पुरोगामी प्रयत्न करी. अशात प्रिन्सिपॉल दाभोळकर, भालजी पेंढारकर, गोविंदराव कोरगावकर प्रभृती मंडळी होती. पुढे प्रभाकरपंत कोरगावकर सक्रिय झाले. या मंडळींनी स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या कार्यकत्यारची पाठराखण केली व समाजकार्यास अभय दिले. यातून इथे वंचितांच्या विकासाचे कार्य सुरू झाले. मी ज्या रिमांड होममध्ये वाढलो ते स्वातंत्र्यानंतर सन १९४९ ला सुरू झाले. त्याच्या स्थापनेतही प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकरांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पत्नी डॉ. अहिल्याबाई दाभोळकर, रमाबाई शिरगावकर, इंदिराबाई देशपांडे या कार्यकर्त्याही कार्यरत होत्या.
 मी सामाजिक कार्याची सुरुवात शिक्षक संघटनेने केली असली तरी समाज उभारणीचे काम माझ्या हातून झाले ते इथल्या रिमांड होमचे रूपांतर बालकल्याण संकुलात करण्याच्या सन १९८० ते २००० या काळात.शां.कृ.पंत वालावलकर, नानासाहेब गद्रे,वि.स.खांडेकर, माईसाहेब बावडेकर,लीलाताई पाटील,कॉ.गोविंद पानसरे,डी.बी.पाटील,