साली सुरू होता आणि मी कोल्हापुरात निधी संकलनासाठी आलो होतो. त्या वेळी पंढरपूर बालकाश्रमाला ओळखणारी फार कमी मंडळी कोल्हापूरमध्ये होती. त्यामध्ये नाना एक होते. आम्ही त्या दिवशी कोल्हापूरमध्ये भरपूर फिरलो. पण अवघे पाचशे रुपये आम्हाला जमवता आले. त्या वेळी पाच हजार रुपये आम्हास जमवायचे होते. शेवटी संध्याकाळी आम्ही नानांच्याकडे गेलो. नानांनी बालकाश्रमाची विचारपूस केली. मग आम्ही सांगितलं की, आम्हाला पाच हजार रुपये कोल्हापुरातून न्यायचे होते आणि पाचशेच रुपये जमलेले आहेत. नाना म्हणाले, 'मी तुम्हाला पाचशे रुपये देतो आणि उद्या तुम्ही या. आपण एक चार ठिकाणी जाऊ आणि बघू काय जमतात ते. दुसऱ्या दिवशी आम्ही नानांच्याबरोबर फिरलो आणि आम्हाला सहा हजार रुपये मिळाले. आधी एक हजार रुपये मिळाले होते. म्हणजे पाचाचे सात करण्याची नानांची जी एक आचरणशुद्धता होती ती आपण सगळ्यांनी अनुकरण करण्यासारखी आहे.
नानांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये जे काही गुण मला प्रकर्षाने दिसून येतात ते गुण आज मला परत अशासाठी आठवावे वाटतात की, आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. अठरा वर्षांनंतर जेव्हा नानांचं आपण स्मरण करतो तेव्हा ते गुण जवळजवळ इतिहासजमा झाल्याचे लक्षात येतात. नाना मोठे उदार होते असं सगळे लाके सांगतात. दहा-दहा पैशांनी एके काळी त्यांनी कोल्हापुरात वीस हजार रुपये जमा केले होते. आज तुम्ही कोल्हापुरात जा आणि दहा- दहा पैशांनी वीस हजार जमवा रुपये तुमच्या लक्षात येईल की ते किती कठिण असते. काळ बदलतो तशी वृत्ती बदलते. काही-काही गुण तर इतिहासजमाच होतात. नानांच्यामधले कितीतरी गुण आज आठरा वर्षांमध्ये... अवघ्या एका पिढीमध्ये तुम्हाला इतिहासजमा झालेले दिसतील.
नानांच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट अशी होती की ते मितभाषी होते. फार कमी बोलायचे. पण त्या शब्दामध्ये कुणाला काही लागणारं नसायचं. नानांचं कुठं भांडण झालंय, नानांचे कुठे मतभेद झालेत अशी एकही संस्था तुम्हाला मिळणार नाही. नानांना कुणी वैरी आहे असं कधी झालं नाही. कोल्हापूरातच नव्हे, कुठंही ते अजातशत्रू मनुष्य होते. बाबूराव धारवाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांचा जो सत्कार केलेला होता त्याचं वर्णन त्या वेळी वर्तमानपत्रात आलं होतं की, 'नाना उभे होते आणि नानांच्या टोपीपयर्तं हारांचा ढीग गेलेला होता. सहा फूट हारांचा ढीग ..त्यामाणसानं या कोल्हापुरात हा सन्मान मिळविला... कोल्हापुरामध्ये