पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रेशनवर ही सही करायचे. त्या काळामध्ये असा एक प्रघात होता. नाना आणि बापू गाडीमध्ये बसलेले असायचे.
 त्यांच्या गाड्या दुकानासमोर थांबायच्या आणि बाबूराव धारवाडे चंद्रकांत पाटगावकर अशी कार्यकर्ती मंडली सांगायची की नाना आणि बापू गाडीत आहते आणि हे पावती पुस्तक आहे. लोकांनी निमूटपणे पावत्या फाडायच्या असा रिवाज कोल्हापूरमध्ये होता. त्याचं कारण असं की, कोल्हापूरातल्या सगळ्या समाजाला हे माहीत होतं की ही मंडळी पहिल्यांदा स्वतः पैसे घालतात आणि मग दुस-यांच्याकडे मागायला जातात.
 त्या ‘सामना' सिनेमामध्ये ‘उरलेल्याचं आपण बघू' तसा हा व्यवहार नव्हता. तुम्ही 'सामना' सिनेमा आठवा. त्याच्यामध्ये जो नेता आहे तो पुतळ्याला पैसे गोळा करतो आणि पुतळ्याच्या खर्चापेक्षा जास्त पैसे गोळा होतात. एक प्रामाणिक कार्यकर्ता त्या नेत्याला विचारतो की, “अहो, ते पैसे थोडे उरलेले आहेत. यावर नेता म्हणतो, 'ते तुला कळणार नाही. उरलेल्या पैशाचं नंतर आपण बघू. नंतर बघू म्हणजे माझं मी बघतो. असा व्यवहार कधी नानांनी त्या काळामध्ये केला नव्हता.
 नाना आणि प्रा. चंद्रकांत पाटगावकर सर त्या वेळच्या 'इंडियन रेडक्रॉस'मध्ये काम करीत. त्या काळात मी त्यांच्या संपर्कात आलो. पासष्ठच्या दरम्यान चीन आणि पाकिस्तानचं फार मोठे युद्ध झालं होतं. बासष्ठ आणि पासष्ठला. त्यामुळे नेहरूंचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. त्या काळामध्ये सैनिकांना इथून ब्लँकेटस् जायची. धान्य जायचं. जी मंडळी शहीद व्हायची त्यांच्या घरोघरी जाऊन पैसे देण्याचे काम नाना निधी उभारून करायचे. जमलेला सगळा निधी युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांपर्यंत कसा जाईल याचा एक वस्तुपाठ नानांनी त्या काळामध्ये निर्माण केलेला होता. त्या रेडक्रॉसमुळे आज एक मतिमंदाची शाळा सुरू आहे. ब्लड बँकरोटरी क्लबने सुरू केलेली असली तरी पहिल्या काळामध्ये या रेडक्रॉसने तिच्या उभारणीत फार मोठी मदत केलेली तुम्हाला दिसेल.

 नानांकडे एक संस्थात्मक उदारपण होतं. एखादी संस्था उभारली तर ते कधी ईर्षा म्हणून पाहायचे नाहीत. नानांचे जितके मित्र रोटरी क्लबमध्ये होते, तितकेच मित्र लायन्स क्लबमध्ये होते. नानांचे दोन्हीकडे छान येणंजाणं असायचं. ते नानाच करू जाणे.कोल्हापूरमध्ये ‘अनाथाश्रम' आणि ‘रिमांड होम' नावाच्या ज्या दोन संस्था होत्या, त्याचे ते अगदी सुरुवातीपासूनचे आश्रयदाते होते. हा मनुष्य किती मोठा होता त्याचा एक चांगला प्रसंग मला आठवतो... माझ्या पंढरपूरच्या बालकाश्रमाचा शताब्दी महोत्सव १९८६

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४६