पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनसेनेचा त्या काळात कोल्हापुरात फार मोठा ‘दारारा' होता. मी ‘दरारा शब्द जाणीवपूर्वक वापरतो.
 कारण ती सभा मला माहित आहे. त्या काळामध्ये बाबूराव धारवाडेंच्या जनसेनेने कोल्हापुरामध्ये महागाईविरोधी मोर्चा उघडलेला होता. आणि असं सांगितलं होतं की, चहा अमुक पैशालाच हॉटेलमध्ये मिळाला पाहिजे. मटण अमुक दराने विकलं गेलं पाहिजे. कोल्हापुरात असल्याने मटणाचा आग्रह जास्त! त्या वेळी व्यापा-यांचे प्रतिनिधित्व करणारी जी संस्था होती, त्याचे नाना पदाधिकारी होते. व्यापारी हे हटून बसलेले की अमूक दर झाल्याशिवाय ही बैठक संपणार नाही आणि व्यापारी काही रुपये दोन रुपये कमी करायला तयार नव्हते. त्या वेळी नाना त्या सभेमध्ये उभे राहिले.
 कलेक्टर कचेरीमध्ये अत्यतं तणावाचे वातावरण, हमरीतुमरीचं वातावरण. राजकीय मंडळी काही मागे घ्यायला तयार नाहीत. व्यापारी मंडळी काही तसूभर हलायला तयार नाहीत. नानांनी सगळा नूर बघितला आणि उभे राहिले. त्या वेळी त्यांनी व्यापा-यांना जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले, 'अरे, आपण पिढ्यानपिढ्या व्यापार करतो आणि खरं लोकांना माहीत नाही की आपण किती कमावतो ते. आपल्या मागील पिढ्यांनी भरपूर कमावलंय. आपणही भरपूर कमावलंय. असं करा, ते जे म्हणतात ना त्या दराने विका, जरा चार तास जादा कष्ट करा आणि रुपये दोन रुपये कमी पडतील ते मिळवा. त्या काळामध्ये शहरात नानांच्या सत्चरित्राची अशी एक जादू होती की, नानांनी सांगितल्यावर ते प्रमाण असायचं. मग ते सार्वजनिक ठिकाण असले, संस्थात्मक बैठक असेल, किंवा एखादा उपक्रम असले. नानांनी सांगितलं की तो आदेश मानला जायचा. बाबूराव धारवाड्यानं त्या काळामध्ये राजकीय कार्यकर्ते म्हणून मान्यता देण्याचं काम ज्या सभेनं केलं त्या मान्यतेमध्ये नानांचा सिंहाचा वाटा आहे आणि बहुतेक त्याचीच उतराई म्हणून बाबूरावजी हा नाना गद्रे यांच्या स्मृतिदिनाचा उपक्रम इतकी इतकी वर्षे करत असावेत. हा देखील एक वस्तुपाठ नानांनीच त्यांना दिला असावा अशी माझी धारणा आहे.

 आपण कोल्हापूरमध्ये जी महालक्ष्मी धर्मशाळा' पाहतो ती नानांच्या कार्यकाळातील आहे. महालक्ष्मी धर्मशाळेच्या उभारणीच्या त्या काळामध्ये सिमेंटची टंचाई होती. पण नाना कलेक्टरांच्याकडे जायचे आणि कलेक्टर अगदी डोळे झाकून नानांना पाहिजे तेवढे सिमेंट द्यायचे आणि सळईच्या

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४५