पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर‘हरी पांडुरंग.' म्हणजे आपल्या वडिलांचे नाव देऊन त्यांनी एच. पी. जी. म्हणजे एच. पी. गद्रे अशा नावावर आपला बँड सुरू केला. विसाव्या शतकामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं स्मरण फार कमी मंडळी ठवे ताना दिसतात. अशा अपवादामध्ये नाना एक होते. कलकत्त्याला त्यांनी चहाची पेढी सुरू केली. त्यांनी तिथे असं पाहिलं की, इतर चहाचे व्यापारी आपला एक ब्रांड तयार करतात आणि आहे तोच माल विकतात. अशा अनेक संशोधन पद्धती त्यांनी बाजारात आणल्या.
 पुणे हे तसं ब्राह्मणांचं शहर. नानांनी त्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरात कसला उद्योग करावा? त्यांनी काही चितळ्यांची डेअरी नाही सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये ‘फिशरी' सुरू केली. नाना मासे खायचे नाही पण धंदा मात्र माशाचा केला. आता मला मोठं आश्चर्य वाटतं की मासे न खाणाऱ्या या माणसाला मासा विकता कसा येत असेल? तर त्यांचा व्यापारामध्ये ठरलेला शिरस्ता असायचा. एखाद्या माणसाला ते मॅनेजर म्हणून बसवायचे. मॅनेजरवर प्रचंड विश्वास. त्यांच्या भरवशावर धंदा करायचे.
 अनके वर्षांपासून इथल्या बसंत-बहार थिएटर्ससमोर असलेल्या पंपावर मी पेट्रोल भरतो. तिथं आमचा ओळखीचा एक मित्र आहे. त्याला मी नेहमी विचारायचो, “अरे अशोक, सगळं गांव पेट्रोलमध्ये, भेसळ करून विकतंय. तुम्ही शुद्ध पेट्रोल विकता, परवडतं कसं?' तो मला सांगतो की 'नानांनी आम्हाला प्रामाणिकपणाचं एक ब्रीद घालनू दिलले आहे. दुस-या महायुद्धातत्या काळामध्येदेखील नानांनी आपल्या पेढीचा शद्धतेचा रिवाज जपला होता. त्या काळामध्ये नाना शंभर-शंभर टैंकर रॉकेल या कोल्हापूर आणि कोकणामध्ये विकायचे. अशा काळात देखील त्यांनी कधी रॉकेलमध्ये भेसळ केली नाही किंवा फेसाचं रॉकेल विकलं नाही. ही सचोटी त्यांनी केवळ आपल्यामध्ये आणली नाही तर आपल्या नोकरांच्यामध्ये देखील रुजवलेली दिसेल.
 एखादा नोकर जर काम करत नसेल तर नानांची शिक्षा जगावेगळी असायची. ते त्याला आपल्या दुकानात नुसतं बसवून ठेवायचे, पण काम सांगायचे नाहीत. पगारही द्यायचे. तो ओळखायचा की आता आपलं इथलं क्रियाकर्म संपलेलं आहे. आपण निघून गेलेलं बरं. तो लाजून निघून जायचा.

 नानांनी व्यवसाय करताना अनेक प्रयोग केले. त्यातलाच एक भाग म्हणून नंतर ते ऑईल इंजिनच्या धंद्यात आले, केमिकलमध्ये आले, पेट्रोल

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४०