पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी कधीही कोणताही धंदा तोट्यात केला नाही. मला वाटतं, चद्रं कातं गद्रे आजही सांगतील की ते काणे ताही धदा तोट्यात करत नाहीत. धदा तोट्यात निघाला की ते बदलतात. नानांनी आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने व्यवसायामध्ये इतक्या मुशाफिरी केल्या. त्याचं खरं कारण तुम्हाला अनंत हरी गद्रयांच्या दूरदृष्टीत दिसेल. त्या काळामध्ये माणस शिकायला लागली होती, वाचायला लागली होती. शिक्षणाचा प्रचार सुरू झाला होता आणि अशा काळामध्ये पूर्वी इंग्रजी साहित्य वाचणारी मंडळी मोठ्या प्रमाणात मराठी वाचू लागली होती. ती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी गथ्र विकत घेऊ लागली होती. काळामध्ये मराठी पुस्तकाच्या व्यवसायामध्ये आपण आलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं. त्या काळात नाटके चालायची. किर्लोस्कर कंपनी, खाडिलकर कंपनी, नंतरच्या काळामध्ये बालगंधर्वांची नाटकं असायची. त्यांनी नाटक कंपनी व्यवसाय म्हणून सुरू केली. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नाटकांच्यामुळे संस्कृतीचा प्रसार झाला वगैरे खरं आहे, पण मुळात यांची बैठक ही अशी की असा व्यवसाय करायचा की त्या व्यवसायातून समाजाला ऊर्जितावस्था यावी, त्या व्यवसायातून आपल्याला चार पैसे मिळावते. जे काही करायचं ते सचोटीनं करायचं असा एक संस्कार अनंत हरी गद्र्यांनी नानांना दिला.
 नानांच्या सगळ्या चरित्रामध्ये अनतं हरी गद्र्यांचा आणि आईचाही साधेपणा दिसनू येतो. सचोटी ही त्यांच्यामध्ये या दोघांची दिसेल. याचं कारण असं की या दोघांवर, आईवर आणि त्यांच्या मोठ्या भावावर गांधीजींचा फार मोठा प्रभाव होता. अनतं हरी गद्रे खादीचे कपडे घालायचे. गांधी चळवळीमध्ये त्यानी फार मोठी भागिदारी कोकणामध्ये केलेली आपणास दिसले. त्यामुळे नाना हे ख-या अर्थाने गांधीवादी असलेले दिसतात. नाना गांधीवादी का? नाना प्रामाणिक का? याचा शोध जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो त्यांच्या पूर्वाश्रमीच्या संस्कारामध्ये तुम्हाला दिसेल.

 चौथीपयर्तं नानाचं प्राथमिक शिक्षण देवरूखला झाल. इंग्रजीत ते देवरुखला शिकले. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये असं ठरलं की एका मुलाला शिकवायचं. गद्रे कुटुंबामध्ये त्या काळात फार माणस उच्चशिक्षित नव्हती. सगळ्यांची अशी धारणा होती की नानांना पदवीधर करायचं. मग असं ठरलं की नानांनी देवारुखहून बसनं रत्नागिरीला जायचं आणि रत्नागिरीहून बोटीने मुंबईला जायचं आणि शिकायचं. नानांना जर त्या दिवशी बोट मिळाली असती तर नाना कदाचित व्यापारी झाले नसते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३६