पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोल्हापुरामध्ये टिळकांचा वेदोक्त प्रकरणासंबंधीचा फार मोठा इतिहास आहे. शाहू महाराजांशी त्याचा संबंध आहे. अशा टिळकांचे भक्त असलेले अनंत हरी गद्रे देवरूखसारख्या गावात सहभोजन करायचे. ते पत्रकारही होते. त्या काळात ‘निर्भीड' नावाचे ते पत्र चालवायचे. त्याकाळी ‘संदेश नावाचं ही एक पत्र टिळक चालवत असत. त्याचे ते बातमीदार होते. अशा माणसाचं जीवन नानांनी आपल्या लहान वयामध्ये पाहिलेलं होतं.
 तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की, नानांनी वयाच्या पंधराव्या वर्षी जो पहिला उद्योग सुरू केला तो कोणता होता? नाना पहिल्यांदा प्रकाशक झाले, हे फार कमी लोकांना माहीत असेल. नानांनी त्यांचे मोठे बंधू दामोदरपंतांच्या बरोबर व्यापार सुरू केला खरा, पण खरा व्यापार त्यांनी मुंबईला जाऊन सुरू केला. आज मराठीतील सगळ्यात प्रख्यात जी प्रकाशन संस्था आहे ‘मौज प्रकाशन.' हे मौज प्रकाशन मित्रांनो, पहिल्यांदा गद्रे परिवारानं सुरू केलं. आज श्री. पु.भागवतांचं म्हणून ते ओळखलं जात असलं तरी ते गद्रे बंधूनी पहिल्यांदा सुरू केलं होतं. त्या काळामध्ये मला जी माहिती आहे त्याप्रमाणे आचार्य अत्रे कवी म्हणून प्रकाशात आले ते अनतं हरी गद्र्यांच्यामुळे. त्यांची झेंडूची फुले' हा काव्य संग्रह आणि 'गीतगंगा' नावाचे खडे काव्य अनतं हरी गढ्यांनी प्रकाशित केल. न. चिं. केळकराचं ‘नवलपूरचा संस्थानिक’ आणि ‘भारतीय तत्त्वज्ञान जे आज आऊट आफैं प्रिंट आहे आणि ज्याला आपण तत्त्वज्ञानातला फार मोठा ‘माइल स्टोन' म्हणतो असं पुस्तक अनतं हरी गद्रयांनी आपल्या प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं. वि. स. खांडेकरांना लेखक करणारे अनंत गद्रेच होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. 'दोन ध्रुव' सारखी कादंबरी नानांनी आणि अनंत हरी गद्रयांनी प्रकाशित केली होती. एवढंच नव्हे, इतिहासामध्ये आपण खोल जायला लागल्यानंतर असं लक्षात येईल की ही गद्रे फॅमिली आहे ना, त्यांचं गद्रे नाव का पडलं मला माहीत नाही. खरं म्हणजे त्यांच्या गद्रेमधला जो ‘जी' आहे ना, त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे, ‘गुडविल', त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे ‘गोल्ड', त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे ‘जनरस' - अशी पिढ्यानपिढ्या एक मोठी परंपरा या माणसांनी निर्माण केली ती या पहिल्या प्रकाशनाच्या व्यवसायातून.

 त्या काळामध्ये अनतं हरी गद्रे यांनी सिनेमा आणि नाटक कंपनी स्थापन केली होती. आता तुमच्या लक्षात येईल की, ही ब्राह्मण परिवारातली मंडळी नाटक आणि सिनेमा काढतात ही आश्चर्याची गोष्ट असेल . पण तुम्हाला गद्रे परिवाराचा एक फार मोठा गुण मी सागंतो की,

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३५