पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की, कलेक्टर कचेरीमध्ये एक अशीच काणे ती तरी निधी सकं लनाची सभा होती. बरचे वक्ते बोलत होते, ‘असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अमुक निधी जमा केला पाहिजे. यापद्धतीने त्या पद्धतीने इ.,' सगळे बोलल्यानंतर नाना उभारले आणि फक्त एकच वाक्य बोलल्याच त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले ‘तुम्ही कसा निधी जमवायचा तो जमवा’ ‘माझे एक हजार रुपये घेऊन काम सुरू करा.' बाकी सगळ्यांनी भाषणं केली, पैसे फक्त नानांनी दिले. नानांची उदारता अशा एका छोट्या उदाहरणातून स्पष्ट होते.
 नाना हे कोल्हापुरातले ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे' असं आचरणातून सांगणारे गृहस्थ होते. नाना हे कोल्हापुरातलं असं एक ‘शिडाचं जहाज होतं... मी ‘शिडाचे जहाज' अशासाठी म्हणतो की, या माणसानं पहिल्यांदा व्यापार शिडाच्या जहाजातून केला होता. शिडासारखा शुभ्र. ज्यांनी-ज्यांनी नानांना पाहिलंय त्यांच्या असं लक्षात येईल की अत्यंत ताठ, माझ्यापेक्षा जास्तच उंची होती त्यांची आणि नानांचं नाक जितकं सरळ होतं तितका टोपीचा कोनही सरळ होता. नानांनी कार्यकर्ता असूनही टोपी कधी तिरकी घातली नाही. तिरकी चाल नव्हती नानांची, सरळ चाल! (मी बुद्धिबळातल्या उंटासारखी सरळ चाल म्हणत नाही.) नाकासमोर चालणारा सरळ सोज्वळ मनुष्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नानांना पाहिलेलं आहे. नानांच्या बरोबर मी साधारणपणे सहा एक वर्षे तरी बालकल्याण संकुलाचं काम केल्याचं मला आठवतंय. नंतर निवासराव पवारांच्या बरोबर महालक्ष्मी धर्मशाळेचं काही काम केलं. जनता बँकेमध्ये नानांच्या बरोबर काही वर्षे काम केलं. त्यांच्या रोटरी क्लबचा मी एक वर्ष सदस्य होतो. असे अनेक प्रसंग सांगता येतील. या सगळ्या प्रसंगातून मला कळलेले नाना आज जीवन आणि कार्याच्या रूपात मी तुमच्यापुढे उभे करणार आहे.

 नानांच्याबद्दल बोलत असताना, त्यांचे जीवन समजनू घते असताना, त्यांचे कार्य समजून घेत असताना आपण दोन गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की, नानांच्या जीवनाची जी सगळी उभारणी आहे ती दोन व्यक्तींच्या आदर्शावर उभी आहे. एक म्हणजे त्यांची आई. त्यांची आई फार शिकलेली होती असं नाही. नाना दहा वर्षांचे असतानाच नानांचे वडील वारले आणि नानांचं सगळं जीवन आईनं अशा ऊर्जित अवस्थेत आणलं. ही आई अत्यंत कनवाळू आणि ममत्व असणारी होती. नानांनी आपल्या शिवाजी पार्कमध्ये बांधलेल्या बंगल्याला ‘ममता' असे नाव दिलेलं मला आठवतं. हे ममता म्हणजे आईचं स्मरण होतं अशी माझी धारणा आहे. ही ममता कशी होती?

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३३