पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निष्काम कर्मयोगी : शिवराम हरी गद्रे

 शिवराम हरी गद्रे याना सवर्जण नाना या नावानचे ओळखत. नानासाहबे गद्रे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे आदर्श होते. मला एक प्रसगं या निमित्ताने आठवतो. १९८६ साली नाना गेल्यानंतरची पहिली श्रद्धांजली सभा बालकल्याण संकुलात झालेली होती. मला तो प्रसंग अशासाठी आठवतो की, त्या सार्वजनिक सभेला कोल्हापुरातील सगळ्या सावर्जनिक संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण आवर्जून दोन शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी या सभेला उपस्थित होते. ते म्हणजे त्या वेळचे जिल्हाधिकारी आणि डी. एस. पी. गणपतीचा मोसम होता. डी. एस. पी. बंदोबस्ताच्या फार मोठ्या कामात गुंतलेले होते आणि त्यांना मी फोन करून सांगितले की नानांची सार्वजनिक श्रद्धांजली सभा आहे. तर त्यांनी निकराचा बंदोबस्त असताना देखील तो बाजूला ठेवला आणि नानांच्या सभेला ते आले. तीन वर्षांसाठी कोल्हापुरात आलेल्या एका सरकारी अधिका-याने त्या वेळी नानांच्याबद्दल जे उद्गार काढले ते ऐकून मी पुरेपूर हेलावून गेलो होतो ते असे म्हटले होते की, “आम्ही सरकारी अधिकारी अनके शहरामध्ये बदलीवर जात असतो. अनेक प्रकारचे लोक पहात असतो आणि लोक पाहण्याची, पारखायची एक सवय आपोआप आमच्या कार्यपद्धतीत येऊन जाते. माणसू बघितला की तो पाण्यात किती आहे आणि पाण्याबाहरे किती आहे हे आम्ही लगेच ओळखतो.'नानांच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं होतं की, "या गृहस्थांना आम्ही पहिल्यांदा रेडक्रॉसच्या सभेमध्ये पाहिलं. त्यांचे विचार ऐकले आणि आमच्या असं लक्षात आलं की हा सचोटीचा मनुष्य आहे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३२