पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गृहस्थ जीवनात ब्रह्मचर्य, व्यापारात सचोटी, सामाजिक कार्यात प्रसिद्धी-पराङ्मुखता, शैक्षणिक कार्यातील परिवर्तनवादी दृष्टी या सवारमुळे त्यांचे जीवन व कार्य एक ‘करुणाकल्पतरू' बनून गेले.
 'मी काही घेऊन आलो नव्हतो. येथून जातानाही मला काही घेऊन जायचे नाही. येथे जे मिळवलं, ते इथलंच होतं. लोक त्याला 'दान' म्हणतात. मला विचाराल तर ज्याचं होतं, ज्याच्या हक्काचं होतं, त्यांना दिलं. देण्यात औदार्य नव्हते. मी तो हमालभारवाही' 'मिळवतानाही नि देतानाही!' अशा निरिच्छ वृत्तीने शां. कृ. पंत वालावलकर यांना जगताना मी अगदी जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. त्यांच्या या निरिच्छ वृत्तीनं प्रभावित होऊन करवीर पीठाचे शंकराचार्य पंतांच्या ‘सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात म्हणाले होते की, "पंत वालावलकर हे ‘संत वालावलकर आहेत." वालावलकरांना सर्व सानथोर बापू नावानेच ओळखतात. पण त्यांचं समग्र जीवन म्हणजे संतांच्या गाथांचा वस्तुपाठ! माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे १९५९-६० पासून गेली चाळीस वर्ष मी निरनिराळ्या भूमिकेतून त्यांना पाहिलं, अनुभवलं. प्रारंभी, त्यांनी चालविलेल्या रिमांड होमचा एक अनाथ, निराधार आश्रित, नंतर रिमांड होममध्येच त्यांचा सहकारी, पुढे त्यांच्या संस्थांचा विश्वस्त, नंतर सर्व विश्वस्त संस्थांचा सचिव मी त्यांच्या ‘किचन कॅबिनेट'मध्ये केव्हा गेलो ते कळलेच नाही. बापूंना माणसांची मोठी जाण नि पारख होती. त्यांनी आपल्या हयातीत मुंबईपासून मुणग्यापर्यंत अक्षरश... शेकडो संस्थांचा पितृवत प्रतिपाळ केला. महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीस प्रमाण मानून ते जगत आले.
 बापूंचं समग्र जीवन म्हणजे ‘कर्तृत्व गाथा'वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी वडिलांशी मतभेदाचं निमित्त झालं नि त्यांनी आपलं जन्मगाव देवगड सोडलं नि मुंबई गाठली. मुंबईत हरतऱ्हेचे व्यवसाय, नोकरी करत राहिले. ‘शब्दप्रामाण्य' हे त्यांच्या जीवन यशस्वीतेचे रहस्य. अपार कष्ट, सचोटी, दुस-याबद्दलचा कळवळा यांच्या जोरावर ते रंकाचे राव' झाले, पण मनाला त्यांनी कधी अहंकार शिवू दिला नाही. दुकान, घर, संस्थांतील नोकरदार, कर्मचारी यांच्याबद्दल त्यांच्या मनात कणव होती.

 संस्थांत पगारवाढ बापू स्वतः करत आले. ज्या ज्या संस्थांचा संसार बापू सांभाळत आले तिथे कधी संप, निदर्शने, उपोषणे झाल्याचं मला आठवत नाही. महत्त्वाकांक्षी बापूंनी कर्मभूमी म्हणून कोल्हापूरची निवड

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/२१