पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्या ज्या ठिकाणी ते चालू आहेत त्या संस्थांना जरूर ती मदत करणे, लायक व गरजू विद्याथ्र्यांना अर्थसाहाय्य करणे, जातीपातींचा विचार न करता होतकरू विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या विविध सोयी सवलती उपलब्ध करून देणे, गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृहे चालविणे व अशा संस्थांना अर्थसाहाय्य करणे या उद्देशांसाठी विश्वस्त निधीचा विनियोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती. दाभोळकर परिवारास कर्करोगाने ग्रासले नि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. हे शल्य लक्षात घेऊन विद्यमान विश्वस्तांनी दाभोळकर बंगल्यात कर्करोग निदान सुरू केले. त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही हे लक्षात घेऊन जनरल हॉस्पिटलची एक सध्याच्या योजना विश्वस्तांच्या विचाराधीन आहे. आज दाभोळकर कॉर्नरला उभी असलेली रॉयल प्लाझा ही टोलेजंग इमारत म्हणजे आजचे दाभोळकर मेमोरियल होय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५