पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकड्यांपेक्षा अक्षरांच्या वळणांनी त्यांना मोहित केलं. त्यांनी लोकल बोर्डाला रामराम ठोकला व ते लिहीत राहिले आणि लेखक बनले. पंचायत राज्य व्यवस्थेवरील सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर लिहिलेल्या मार्गदर्शक पुस्तिका आजही आख्ख्या महाराष्ट्रात प्रमाण मानल्या जातात.
 बाबूराव धाडवाडे यांच्या समाजकार्याची आपली अशी एक वेगळी वळणवाट आहे. ते आपला घरसंसार स्वतःच्या पैशावर चालवत सामाजिक काम करत राहतात. सामाजिक व राजकीय कार्य हा कधी त्यांनी आपला पोटा-पाण्याचा उद्यागे केला नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाई माधवराव बागल हे त्यांचे जीवन आराध्य. राजर्षी छत्रपती शाहूच्या विचार व आचारांचा वसा आणि वारसा एकदा त्यांनी स्वीकारला तो आजवर टिकवला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य टिकवण्याच्या प्रत्येक लढाईत ते अग्रणी राहिले आहते. राजर्षी शाहू स्मारक भवनची उभारणी, उत्तर प्रदेशात शाहू जिल्ह्याची निर्मिती, विधान भवनातील शाहू पुतळा, करवीर गॅझेटमधील छ. शाहूसंबंधी मजकूर दुरुस्ती, गंगाराम कांबळे व छ.शाहूच्या अद्वैत संबंधांचा सामाजिक स्मारक स्तभं,दूर चित्रवाणीवरील शाह मालिका, छ. शाहू जन्मशताब्दी महोत्सव अशी एक लांब लचक सूची होऊ शकेल. या साऱ्या उपक्रमांतून बाबूराव धारवाडे यांची भागिदारी, नेतृत्व हा त्यांच्या अतूट शाहू भक्तीचा ढळढळीत पुरावाच.

 बाबूराव धारवाडे, सखारामबापू खराडे, भिकशेठ पाटील, प्राचार्य रा. कृ. कणबरकर ही अशी काही कोल्हापूरातील माणसं आहेत की ते विविध कार्यातून कोल्हापूर जागं ठेवतात. त्यात आणखी एक व्यवच्छेदक नाव म्हणजे अॅड. गोविंद पानसरे. हे कोल्हापूरच्या विद्यमान पुरोगामी चळवळीचे पंचप्राण म्हटले तर वावगे ठरणार नाही. यात बाबूराव प्रबोधनाच्या अंगाने कोल्हापूर जागं ठेवत कार्यकर्ता घडविण्याचा ध्यास घेतलेले कर्मवीर. पन्हाळ्याला सतत ते कार्यकर्ता प्रबोधन शिबिरं योजतात.छ.शाहूंचं कोल्हापूर टिकवण्यासाठी तरुण कार्यकर्ते ते सतत हेरतात.त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांचं नाव व्हावं म्हणून त्यांना संधी देतात. त्यांना पुढे करतात. स्वतः मागे राहतात. फोटोला पुढे होणाऱ्या (इतरांना मागं ढकलून!) अन्य समकालीन पुढाऱ्यांच्या तुलनेत बाबूराव कितीतरी उजवे ठरतात. विजय चोरमारे, उदय गायकवाड,विश्वास पाटील, प्रा. टी. एस. पाटील यांच्यासारख्या बहुजन समाजातील तरुणांची त्यांची निवड त्यामागे त्यांची

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३५