पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२) सयाजीरावमहाराज यांचा विवाह.. 500000000000 तारीख ६ जानेवारी सन १८८० या दिवशी सया- जीराव यांचे लग्न तंजावरची राजकन्या चिमणाबाई. साहेब यांजबरोबर नजरपार्गेत मोठ्या थाटाने झाले. वधूच्या वयाला पंधरावें सरून सोळा वर्ष लागले होते. रात्री दारूकाम पुष्कळ सुटलें. रंगारंगांच्या चंद्रज्योती, तारे, बाण व हवया सुटल्या. मोठमोठ्या फुलबाजांतून तेजः- पुंज फुलांच्या माळा गळाल्या. त्यांचा प्रकाश पडून जिकडे तिकडे लहख दिसत होते. त्यांच्या तेजापुढे मशालींचा प्रकाश फिका पडला होता. हजारों तारे बाण आकाशांत सोसावत जाऊन फाड फाड आवाज होऊन त्यांतील निळे, पारखे, हिरवे, पिंपळे व लाल गोळे यांची दृष्टि झाली. तो मनोरंजक देखावा पाहण्यासाठी हजारों लोकांचे डोळे भा. काशाकडे लागून राहिले होते. का वाड्यांत अंतःपुरांतही दिव्यांचा चकचकाट होता. हंड्या झुंबरांची आरास केली होती. चांदीच्या समया तेवत होत्या. सुवासिक पुष्पांच्या माळा कमानीसारख्या कटक- विल्या होत्या. दास दासी अकंकार भूषणे घालून फिरत होत्या. मुख्य मुख्य मानकरणी बाया भरगच्ची पोषाक करून व दागीने घालून मासाहेबांच्या भोवती बसल्या होत्या.