पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साहेब, मुंबईचे कमँडर-इन-चीफ्साहेब, मुंबईचे हायको- र्टाचे जज्ज, बडे बडे कामदार व इतर थोर गृहस्थ मासाहे. बांच्या आमंत्रणावरून लग्नसमारंभ साजरा करण्याकरिता बडोद्यास आले होते. ताराबाबांचे लग्न राजेबहाद्दर यांजबरोबर तारीख ३१ डिसेंबर सन १८७९ रोजी नजरपागेंत मोठ्या समारंभाने झाले. 'जी ताराबाबा नऊ वर्षेपर्यंत मासाहेबानी प्राणां- पलीकडे जतनकरून ठेविली होती आणि जी केवळ त्यांच्या पंचप्राणांची अंशभूत होती त्या प्रिय कन्येचा देह, किंबहुना जीवित्वाचें साफल्य, दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याचा प्रसंग आला, तेव्हां मासाहेबांना काय वाटले असेल याची कल्पना करा. कन्यादानाच्या वेळेस मातापितरांच्या मनाची, विशेषतः मातेच्या मनाची स्थिति कशी होत असते हैं सांगावयास नकोच. त्यावेळेस डो- ळ्यांतून अश्रु गळाले नाहीत अशी मातापितरे कोठे भा. ढळतील की नाही याची शंका आहे. मुक्या जना- वरांची तुटातूट झाली तर त्यांना सुद्धा वियोग जन्य दुःख सहन होत नाही. त्यांना ते तोंडाने व्यक्त करून दाखविता आले नाही, तरी त्यांच्या हालचालीवरून तें स्पष्ट कळते, असो. ताराबाबांचे लग्न झाल्यावर पुढे सातव्याच दिवशी म. हाराज साहेबांचे लग्न लागले. त्याची हकीकत आतां पु. ढच्या खंडांत देऊ.