पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१३] त्यांचे हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, काळ्या, जांभळ्या, पो- पटी, वगैरे रंगांचे उंची रेशमी शालू व हिय मो- त्यांचे दागीने दीपप्रकाशांत चकाकत होते. वारांगनांचे नाचरंग चालू होते. फुलांचा, गुलाबपाण्याचा, अत्तरांचा ब उटण्यांचा घमघमाट; दिव्यांचा प्रकाश; हिरा, माणिक, मोती व सोने यांची चकाकी; व स्त्रियांच्या नेत्रांचें तेज; या सर्व तेजांची व सुगंधांची तेथे एकच गर्दी झाली होती, त्यांतच लग्नाच्या वेळची सुस्वर व मधुर गाणी चालू होती. लग्नमंडपांत कुलदेवतांच्या पूजाअर्चा होत होत्या. एक- दो वधु व वर अग्नीपुढे हात जोडून लग्नाविधीत गुंतले होते. एकदां वधूला बाया शंगारीत होत्या. एकदां सुवर्णकल- शांतील पाण्याने वधूकडच्या बाया वराचे पाय धुवीत होत्या. लग्नाची घटका भरण्याबरोबर उपाध्ये, जोशी ब इतर मंडळी यांनी मंगलाष्टके म्हणून वधुवरांच्या मस्त- कांवर मंत्राक्षता टाकल्या. दोन्ही लग्ने शिरस्त्याप्रमाणे नज- रपागेंत लागली. मासाहेबांच्या मनोदयानुरूप दोन्ही लग्न. समारंभ यथासांग शेवटास गेले.PPPME राजघराण्यातील स्त्रीपुरुषांचे फोटोग्राफ घेण्याकरिता मुंबईहून मुद्दाम एक फोटोग्राफर आणविला होता. त्याज- कडून सर्वांचे फोटो घेवविले. लग्नमडपाच्या व राजवाड्यांतील अंतःपुराच्या बाहेर बडोदें शहरांत तारीख १५ डिसेंबर १८७९पासून तारीख १६ जा. नेवारी १८८० पर्यंत एक महिनाभर रोज नवे नवे समा- रंभ चारू होते. भेटीच्या, परत भेटीच्या व दरबारच्या स्वाया वाचेघर शहरांत फिरत होत्या. केव्हा केव्हां तोफांच्या सका.