पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागले होते. स्वरुपाने त्या आपल्या मातुश्रीच्या प्रति- बिंबच होत्या. त्यांची वरयोजना सांवतवाडीचे राजेबहादर रघुनाथराव बाबासाहेब सरदेसाई यांच्याशी झाली. तंजा- वरच्या राजघराण्यांतील कन्येबरोबर महाराजांचा विवाह करण्याचे नक्की ठरले. जामात व स्नुषा कशी मिळतात त्याबद्दल मासाहेबांना मोठी काळजी होती, ती दूर होऊन त्यांचा जीव भांड्यांत पडल्यासारखा झाला. FIFTE दोन्हीं लग्नसमारंभांची पूर्वव्यवस्था मासाहेब व दिवाण सर टी. माधवराव यांजकडेच मुख्यत्वाने होती. वधुवरांचे रास कूट, गण-मैत्री, एकनाड, वगैरे बाबतींत दोहीकडच्या ज्योतिषांमध्ये बराच वादविवाद झाला. काही केल्या त्यांचे एक मत होईना. शेवटी, शुभाशुभ ग्रह, लग्नकुंडल्या व राशिकुंडल्या पातड्यांतल्यापातड्यांस राहून उपाध्येबावा व जोशीबाबा यांनी लग्नाचे मुहूर्त काढून दिले. या लग्नसमारंभांच्या पूर्वीची व नंतरची हकीकत सर टी. माधवराव यांनी आपल्या वार्षिक रिपोर्टात चटक- दार भाषेनें दिली आहे. ती हकीकत व त्या समयीं हा- जर असलेले लोक यांजकडून माहिती मिळाली त्यांच्या आधाराने समारंभाचा सारांश येथे देतो. - बडोदें शहरातील रस्ते व सरकारी इमारती दुरुस्त केल्या. राजमार्गाच्या नाक्यानाक्यांवर कमानी उभ्याकरून शृंगारल्या होत्या. सांवतवाडीचे राजेबहादर व तंजावरच्या राणीसाहेब आपआपला सरंजाम घेऊन बडोद्यास दाखल झाल्या. शिवाय, राजपिंपळ्याचे ठाकूरसाहेब, कोल्हापुरच्या राणी-