पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

CURRARY, KHES mokGENERAL refhsसावजानेक याचनालय -काजीला रवंट (पुणे.) ताराबाबाचं लग्न.M दत्तविधान झाल्यावर मासाहेबांची सहा वर्षे महाराजां- च्या व ताराबाबाच्या संवर्धनांत व सन्मार्ग-शिक्षण देण्यांत गेली. त्यासमयीं एका प्रसंगी एक थोर गृहस्थ महारा- जांच्या संबंधाने ह्मणाला-'त्यांना चांगल्या त-हेचे शिक्षण: मिळत असून त्यांजवर मासाहेबांच्या तोडीची देखरेख ठेव- णारी थोर स्त्री दुसन्या कोणत्याही रजवाड्यांत सांपडणार नाही.' शिक्षणालयाच्या बाहेर तरुण महाराजांचा बहुतेक वेळ मासाहेबांच्या सहवासांत जात होता. कोणताही दुर्गुण त्यांना लागू नये ह्मणून मासाहेब फार काळजी घेत असत. सर टी. माधवराव व त्यांचे सहयोगी यांनी राज्यकारभारांत ज्या सुधारणा चालविल्या होत्या त्यांत त्यांनी कधीही ढव. ळाढवळ केली नाही. पक्षाभिमानी, कारस्थानी, खुषामती व महत्त्वाकांक्षी मसकतगारांना त्यांनी आपल्याजवळ कधी थारा दिला नाही. महाराजांना सत्रावें संपून अठरावें वर्ष लागले, व तारा- बाबांना आठ सरून नव वर्ष लागले, तेव्हां दोघांच्या लग्नांचा विचार मासाहेबांच्या मनांत घोळू लागला. - महाराजांचा अभ्यासक्रम संतोषकारक चालला होता. ताराबाबांचा इंग्रजीचा व मराठीचा अभ्यासही ठीक चाक- ला होता. त्यांना घोड्यावर बरेच चांगले बसता येऊ