पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१८] आहेत. दरसाल नवरात्राचे दिवस आले झणजे मासाहेब गर्भ गाणान्या स्त्रियांना मुद्दाम बोलावून त्यांजकडून गर्भे गावधीत असत, व कांहीं गर्भे त्यांनी स्वतः तोंडपाठ केले होते. ते स्त्रीसमानामध्ये त्या कधी कधी गळ्यावर झणत असत, असे समजतें. त्यांना लोकरीचें, जरीचें, रेशमाचे, विणकरीचे आणि कशीद्याचे कामही येत होते. लोकरीचे विणलेले कपडे, कबजे, टोप्या, गळपट्टे, वगैरे त्या तयार करीत. ते जिनस मग आपल्या आप्तस्वकीयांना व नोकरांस त्या देऊन टाकीत. श्रोता बहुश्रुत व रसिक असला झणजे वक्त्याने आप- में काम फार जपून करावे लागते. एकदा एक घांटा खा. लचा हरदास बडोद्यास आला होता. त्याचे श्री तारकेश्वरी कीर्तन झाले. मासाहेब कीर्तन श्रवणास नेहमीप्रमाणे पड- द्याच्या आंत बसल्या होत्या. बुवांनी कीर्तनारंभी अध्यात्म निरूपण विशेष न करतां भाकड कथांचे गुन्हाळ चालविलें. ते काही केल्या आटपेना, तेव्हां त्या जवळच्या एका जाणत्या गृहस्थाला किंचित् हंसून ह्मणात्या-'बुवा कां लेक्चर देण्याला उभे राहिले आहेत, की कथा करीत आहेत' हे त्यांचे मार्मिक शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. जा Camera 131 सेड, (दु.) POONA