पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- [१ ] पेक्षा गुणांची पारख होऊन जी शाबासकी मिळते तिची किंमत अधिक मानली जाते. श्रोत्यांकडून टाळ्यांचा गजर जास्त झाला की, सर्भेत उभा राहूब भाषण करणारा वक्ता, किंवा हरिदास याला दोन जास्त मजेदार गोष्टी सांगावयास हरूप येतो. पदार्थ चांगले झाले आहेत असे म्हटले की, आपण नको नको म्हणत असतां स्वयंपाक करणारा आचारी आग्रहाने जास्त दोन जिलब्या आपल्या पानांत आणून टाकतो. तसेच गवयाला शाबासकी मिळाली की, तो दोन ताना अधिक मारतो. ही माणसांची कृति झाली; पण, मुक्या जनावरालासुद्धां शाबासकी आवडते. पाठीवर बस- लेल्या स्वाराने पुठ्यावर थाप मारून, जरा लगामीचा इशारा करण्याबरोबर घोडा वेगाने धावू लागतो! असो. त्या गाणारणीला त्यांनी एक उंची शालू व रोकड रकम देऊन तिची विदागी केली. अशा रीतीने शास्त्री, दशग्रंथी, गवई, अष्टावधानी, बहुरूपी, खेळकरी, नाटककार, तमाशे- वाले, वगैरे सर्व प्रकारचा गुणी-जन केव्हां केव्हां येऊन मासाहेबांपुढे हजिरी देत असे. त्याला त्याच्या गुणाप्रमाणे बिदागी देऊन पाठवणी करीत. कित्येकांना त्यांच्या गुणाव- द्दल आपल्या सहीचे दाखलेही देत. RETRIES गुजराथेंत प्रतिवर्षी नवरात्रांत देवीच्या नांवाने रचलेले गर्भे आळोआळी बायकांचे मेळे जमून चांदण्यांत धेरे घेऊन बडोद्यासही चाल आहे. तसले गर्ने सरकारी कन्याशाळांतही गायक मास्तरांकडून मुलींना शिकविले जातात. सरकारांत गर्भे रचणाराकडून गांची पुस्तकें तयार करवून ठेविली