पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • आधीच स्त्री शिक्षणासारखा सुंदर विषय, आणि त्यांत

सर टी. माधवरावासारखे श्रीमंत, प्रसिद्ध विद्वान, राज्य कार. णपटु व स्वतः अनुभविक भाषण करणारे, तेव्हां 'आधीच सोन्याचें, वरी जडावाचें, लेणे श्रीमंताचे शोभिवंत' ही उक्ति मासाहेब व दिवाणसाहेब या दोघानांही सारखीच छागू पडते. ते दिवाणगिरीवर असतांना त्यांनी मासाहेबांचे गोडवे गाईले आहेत, तेथे कदाचित् 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' ही म्हण लागू करता येईल; पण, दिवाणगिरी सोडून घरी बसल्यावर त्यांच्या मुखातून हों अक्षरे निघाली आहेत, तेव्हा त्यांची पारख मासाहेबांविषयी कशी होती हे ध्यानात येईल. मासाहेबांना गुणीजनाच्या गुणांची पारख चांगली अस- ल्यामुळे त्यांनी मान डोलविली म्हणजे हाजिरी देणाराला मूठभर मास आल्यासारखे होई. त्यांना स्वतःला चांगले गातां येत नव्हतें व वादनकलेतही विशेष प्रवीणता नव्हती. तरी रागदारीचे ज्ञान त्यांना चांगले असल्यामुळे, गायन- वादन-पटूंचा सन्मान त्यांजकडून चांगला होत असे. एकदा म्हैसुराकडची एक उत्तम गाणारी स्त्री आली होती. ती दोन्ही डोळ्यांनी अंध होती; परंतु, तिच्या अंगी गाण्याचा गण उत्तम होता. तिचें श्री तारकेश्वरी मासाहेबांपुढे एकदा गाणे झाले. त्या मजलसीला दरकदार व शित्येक चांगले चांगले गवईही हाजर होते. तिचे गाणे मासाहेबांनी कान देऊन ऐकिलें, तिचे गायन कला-नैपुण्य पाहून मासाहेब फार खष झाल्या. तिला शाबासकी दिल्याने तिचे गाणे अधिकच खुलत गेले. कां नाहीं खुलणार ? रोकड बिदागी-