पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१] मोठी मनोरम आहे. फारच सुंदर व सुबुद्ध भाहे. त्या राज- कन्येचें नांव तास! किती सार्थ नांव आहे पहा! तारा झणजे नक्षत्र! आणि खरोखरच त्या राजघराण्यांत तारा- बाई केवळ नक्षत्रासारख्याच आहेत. असो, आतां पहा काय प्रकार घडला तो! मातुश्री स्वतः सुशिक्षित असल्या- मुळे कन्येच्या शिक्षणाकडे अगदी लहानपणापासूनच श्यांचे लक्ष्य लागले, व त्याही मोठ्या आस्थेने त्या कामास उपक्रम केला. ह्या कामाविषयीं हणजे बाहेरून कोणी तिन्हाइत सत्तेने किंवा सामोपचाराने त्यांजला काही सांगा. वयास गेले होते असे मुळीच नाही. स्वयमेव अंतःपुरा. पासूनच त्याला प्रारंभ झाला. अशा अल्पवयांत देखील ताराबाईच्या अभ्यासाचा झपाटा कसा चालका होता ह्मणाल! मला तर ती त्वरा पाहून मोठा चमत्कार वाटला, व फार आनंदही झाला. अशा कन्येविषयी मातेला मोठी धन्यता वाटणे साहजिक आहे. महाराणीसाहेबहीं तशाच अभिमानाने मधून मधून मका व गव्हरनर जनरल साहे- बांचे एजंट यांजला राजकन्येची परीक्षा घेण्याकरतां बोल- वावे, तेव्हां फार दिवस लोटले नाहीत तोच आमांस असे वाटू लागले की, पायाशुद्ध शिक्षणाविषयी कन्या आईपेक्षा कांकणभर सरस होणार! धर्म करण्याची बुद्धि, विनय, मर्यादा, सहनशीलपणा,आदिकरून जे अति थोर व अगत्याचे सद्गुण आमच्या स्त्रियांच्या अंगी स्वभावतः वास करतात, त्यापैकी एकालाही धक्का न लागू देण्याविषयी फारच खबर. दारी ठेविली पाहिजे.