पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१४] पुढे सुमारे चार वर्षांनी, झणजे सन १८८४ साली, त्यांनी विजयानगर येथे मुलींच्या शाळेत बक्षीससमारंभाच्या वेळी सभेचे अध्यक्ष या नात्याने जे सुंदर भाषण केलें तें विविध- ज्ञानविस्ताराचे पुस्तक १६ अंक ७ यांत प्रसिद्ध झालें आहे. त्यांतील मासाहेबांच्या संबंधाचा जेवढा भाग आहे ते. वढ्याचाच उतारा या खाली देतो- 'बडोदें राज्याच्या श्री. महाराणी जमनाबाईसाहेब, प्रस्तु. तच्या महाराजांच्या मातुश्री, यांचीच गोष्ट ऐका. त्या महाराणीसाहेबांचे नाव घेतले की, बडोदें संस्थानांत माझ्या आयुष्याच्या जो काळ गेला त्या काळांत घडलेल्या अनेक गोष्टींची आठवण होऊन चित्तास आल्हाद व समाधान झाल्यावांचून नाहींच रहात. त्यांजला वारंवार भेटून अनेक विषयांवर त्यांजपाशी पुष्कळ वेळपावेतों मोकळेपणाने संभाषण करण्याचे पुष्कळ प्रसंग माझ्या अधि. काराच्या संबंधाने मला नेहमी येत. त्यांची ती नैसर्गिक तीव्र बुद्धि व त्यांनी संपादन केलेले अनेक विषयांचे ज्ञान. त्यांची पोक्त समजूत, त्यांचे चातुर्य, त्यांचा उत्तम स्वभाव, यांचे परराष्टेचे कोमल अंतःकरण आणि त्यांचे विनय. संपन्न वर्तन, ही पाहून माझ्या मनांत त्यांच्या विषयीं अति. शय प्रेम व पूज्य बुद्धि उत्पन्न झाली. या तेथील राज. घराण्यांत प्रमुख आहेत, व महाराजांच्या अज्ञानावस्थेत मी संस्थानचा कारभार पहात होतो. त्यावेळी जर त्या माझ्या कृतीस मान देऊन माझें साह्य न करत्या, तर तेथें काम करणे मला पुष्कळच जड जातें, असो. त्या महाराणी- साहेबांस एकुलते एक कन्यारत्न आहे. खरोखरच ती मुलगी