पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

PRAKYAKA GENERALIA ५३ सावजातक वाचनालय खंड १३.१ गणांची पारख. मासाहेबांच्या शरीरसौंदर्याप्रमाणेच त्यांचा सुस्वभाव, शिक्षण, भाषण, धूर्तता, विनय, दयालुत्व, पोक्त समजूत व तीव्र बुद्धि हे चित्ताकर्षक गुण होते. अशी गुणी मनुष्येही कदाचित् पुष्कळ असतील; पण, ज्यांना परगु- णांची खरी पारख आहे अशी मनुष्ये फार थोडी आडळ- तात. गुणांची पारख जेथे चांगली असते तेथें गुणी मनु- ष्याच्या गुणांची खूजही चांगली होते. सर टी. माधवराव हा एक अलौकिक बुद्धिमान पुरुष होता. याचे अंगवर्चस्व व बुद्धिवर्चस्व समसमान होते. त्या वेळेस हिंदुस्थानांत नेटिव लोकांमध्ये सर सालरजंग, सर दिनकरराव राज. वाडे, सर जंग बहादूर व सर टी. माधवराव हे साडेतीन शाहाण्यांत गणले गेले होते. अशा असाधारण मनुष्यापैकी एका पुरुषाच्या हाती बडोद्याचा राज्यकारभार इंग्रज सरकाराने सोंपला होता. त्यांच्या गुणांची पारख मासाहेबांनी बरोबर केली होती. सर टी. नांही गुणांची पारख चांगली होती. त्यांनी आपल्या हाताखाली चांगली गुणी मनुष्य निवडून घेतली होती, व मासाहेबांच्या गुणांविषयी त्यांनी कैक ठिकाणी व कैक प्रसंगी स्तुतिपर लेख व भाषणे केली, ती योग्यस्थळी वाचण्यांत येतील. आता त्यावेळेस ते दिवा. णगिरीवर असल्यामुळे ती कदाचित् विशेष वजनदार मानली जाणार नाहीत; पण, दिवाणगिरी सोडून गेल्यावर