पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ratta lady who affords the noblest example of wis. dom, goodness, and virtus. That which Akbar is among male sovereigns, is Alhulya bai among female sovereigns." ह्याचा भावार्थ असा की:-"हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासामध्ये अहिल्याबाईसारख्या प्रसिद्ध व नामांकित स्त्रीचा नामनिर्देश नसावा ही आश्चर्याची गोष्ट आहे. मिल्ल ह्या इतिहासकारानें कदाचित् काही असंबद्ध माहिती देण्यात येऊ नये ह्मणून तिची हकीकत मुद्दास गाळली आहे. थॉर्नटन ह्या इतिहासकाराने तिच्या नांवा वा नुसता मागमूसही ठेविला नाही, आणि विषयलंपट तुळसाबाईचा वृत्तांत विस्तृत रीतीने प्रसिद्ध केला आहे! माजी कंपनीसरकाराने, हिंदुस्था- मांतील लोकांविषयीं भलभलता गैरसमज उत्पन्न करणाऱ्या ह्या ग्रंथाकरितां, पुष्कळ पैसा खर्च केला; परंतु त्यांत अथपासून इति- पर्यंत लढाईचे च-हाट लाविलेलें आहे. हिंदुस्थानचा खरा इतिहा- सकार अद्यापि निपजला नाही. त्यामुळे हिंदुस्थानांतील लोकांवि- षयीं जो गैरसमज प्रचलित आहे तो नाहीसा होत नाही. मुंबई इलाख्यांतील हिंदुलोकांस स्त्रीशिक्षणाची विशेष आस्था आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी मिस मेरी कार्पेन्टर ह्या बाईच्या सूचनांचा अगत्यपूर्वक स्वीकार केला हीहि चांगली गोष्ट आहे. डा. भाऊ दाजी ह्यांच्यासारखें विद्वान् गृहस्थ स्त्रीशिक्षणार्थ अवतीर्ण झालेल्या एका संस्थेचे अध्यक्ष आहेत हीहि चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्यासार- ख्या प्रवासांप्रेय व पुराणवस्तुसंशोधक गृहस्थांनी, बरोबर रीतीने जन्या कागदपत्रांचा शोध लावून, ह्या प्रख्यात महाराष्ट्र स्त्रीचें एक जंगी चरित्र तयार करणे अवश्य आहे. ह्या स्त्रीचे चरित्र ह्मणजे शहाण- पणा, सौजन्य आणि सद्गुण ह्यांचे अत्युत्कृष्ट उदाहरण होय. हिंद- स्थानांतील राजे लोकांत ज्याप्रमाणे अकबर हा मुकुटमणि, त्याप्रमा- में स्त्रीवर्गामध्ये अहिल्याबाई ही हाये." अर्थात युरोपियन लोक जिच्या चरित्राची इतक्या कौतुकानें प्र. मा करितात, त्या स्त्रीरत्नाचें तेज अद्यापि अंधःकारांत गुप्त असावें