पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

०० ह्यापेक्षा आमच्या स्वाभिमानशून्यतेचे निदर्शक उदाहरण दुसरे काय असणार ? अहिल्याबाईच्या चरित्राची अनास्था फक्त मराठी ग्रंथ- कारांकडूनच झाली आहे, असाच केवळ अर्थ नाही. खुद्द तिचे वं- शजही तिच्या भव्य यशाची योग्यता अद्यापि जाणत नाहीत व तिच्या पवित्र चरित्राची मुळीच पर्वा करीत नाहीत !! ह्याबद्दल जि- तका खेद मानावा तितका थोडाच आहे. अहिल्याबाईचा अल्प वृत्तांत लिहून तिची कीर्ति कायम ठेवण्यास सर जॉन मालकम साहेब जसे निर्माण झाले, त्याप्रमाणे दुसरा कोणी युरोपियन गृहस्थ निर्माण होऊन हे चरित्र सविस्तर लिहिण्याचे काम स्वीकारील तरच तें सिद्धीस जाईल ! एरवी आशा करण्यास दुसरा मार्ग नाही !! खुद्द महासाध्वी अहिल्याबाई हिच्या चरित्राची ही स्थिति, मग इतर इतिहासप्रसिद्ध मराठी स्त्रियांच्या चरित्रांची ह्याहूनही शोचनीय स्थिति असावी ह्यांत आश्चर्य तें काय? नेपोलियन बोनापार्टच्या आईचे' Mother of Napolean' झणून जंगी चरित्र फ्रेंच व इंग्रजीभाषेमध्ये प्रसिद्ध आहे; परंतु नेपो- लियनच्या गुणांवर ताण करणारे महाराष्ट्रराज्यसंस्थापक छत्र- पति शिवाजीमहाराज ह्यांच्या मातुश्री जिजाबाई ह्यांचे चरित्र अद्यापि कोणास श्रुत नाहीं ! जिजाबाईचे चरित्र इतके महत्त्वाचे आहे की तें वांचून कोणासही परमावधीचा आनंद वाटल्यावांचून राहणार नाहीं ! न्यायमूर्ति रानडे ह्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा जो एक भाग नुकताच प्रसिद्ध केला आहे, त्यांत त्यांनी शिवाजी महाराजांच्या साहाय्यकारी मंडळामध्ये जिजाबाईची अग्रस्थानी गणना केली आहे; व प्रांजळपणे असें झटले आहे की:- "If ever great men owed their greatness to the inspiration of their mothers, the influence of Jijabai was a factor of prime importance in the making of Shivaji's cercer, and the chief source of his strength. " (Page 63) हे अगर्दी अक्षरशः खरे आहे. राजमाता जिजाबाई हिच्याच योग्यतेप्रमाणे राजपत्नि सईबाई हिची योग्यता होती. ह्या उभय