पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोरम देखाव्यांत महाराणीसाहेबांच्या दैवदुर्विलसिताचें प्रतिबिंब पडलेले मला दिसले. नीलवर्ण व निरभ्र आका- शांत शुक्राची चांदणी आपल्या अत्यंत उज्वल तेजानें चमकत होती. ती चंद्रबिंबाच्या आड जाऊन ग्रस्त झाली. तेव्हां आकाश निष्प्रभ व उदास दिसू लागले; पण, ही भयाण स्थिति फार वेळ टिकली नाही. थोड्याच अवका. शांत ती ग्रस्त झालेली शुक्राची चांदणी तेजहीन चंद्रबिंबां- तून बाहेर पडून पूर्ववत् प्रकाशमान दिसू लागली. ती जशी चंद्रबिंबांतून मुक्त झाली, तशीच आमच्या महाराणी- साहेब राजकीय ग्रहणांतून मुक्त होऊन ब्रिटिश सरकारा- विषयी कृतज्ञता बुद्धि ठेवून हल्ली आपला काळ आनंदांत घालवीत आहेत. त्यांना एकामागून एक आनंदाचा दिवस येत आहे, व सन्मानावर सन्मान मिळत आहेत. आजच्या त्यांच्या सवर्गीय आणि प्रौढप्रताप सार्वभौम राज्यकर्तीकडून त्यांना 'क्रौन ऑफ इंडिया' या किताबाचा अत्यंत श्रेष्ठ मान मिळून त्या मामाचा अलंकार वंशपरंपरेने होत अस- लेल्या रत्नोपचयाबरोबर राणीसाहेबांच्या गळ्यांत चमकत राहील. आज मिळालेल्या मानाने त्यांच्या अलंकरणविधीची परिपूर्णता झाली, असें ह्मणण्यास हरकत नाही. हे भूषण मासाहेब चिरकाल धारण करोत.' हे सर टी. चे अलंकारिक भाषण किती सुंदर आहे पहा! या भाषणांत मासाहेबांचें स्थित्यंतर कसे झाले होते, आणि पुढे सार्वभौम चक्रवर्तिनीकडून त्यांचा कसा बहुमान होत गेला, याचे त्यांनी हुबेहुब चित्र उभे केले आहे.