पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०] ही इतके झाल्यावर पानसुपारी, अत्तर गुलाब होऊन दर- बार बरखास्त झाला. त्याच रात्री मोतीबागबंगल्यांत युरो.. पियन लोकांचा बडाखाना झाला. त्यावेळेस मेल्व्हिलू साहेबांनी मासाहेबांचे फार फार आभार मानिले. नंतर सर टी. नी मासाहेबांच्या वतीने भाषण केलें तें असें:- 'मेलव्हिल्साहेब, इतर सद्गृहस्थहो, आपण सर्वानी महाराणी जमनाबाई साहेबांचे क्षेमकुशल चितिले त्याजब- इल आभार मानण्याचे काम मजकडे आले याचे मला फार भूषण वाटत आहे. महाराणी साहेबांचे अंतःक. रण अत्यंत संस्कारक्षम असून आपल्या ममताळूपणाचा त्यांच्या मनावर संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने महाराणीसाहेबांना सौख्य पर्वतावरून दुःख गर्तेत एकदम कसे फेंकून दिले होते, हे आपल्यास विदीतच आहे. त्यांचा छळ करणान्या अन्याय मूर्तीला कालगतीने शासन मिळून त्या पूर्ववत् उच्च पदाला पाव- ल्या. या गोष्टीला तीन वर्षे झाली. ज्या राजवाड्यांतून त्या निराशायुक्त अंतःकरणाने निघून गेल्या होत्या त्याच राजवाड्यांत त्यांनी ज्या दिवशी मोठ्या समारंभाने पनः प्र- वेश केला, तो दिवस अद्याप मला चांगला स्मरतो. ती प्रभा- तकालची अति रमणीय व शांत वेळा मला आठवते. त्या दिवशी मोठ्या पहाटेस अंतरिक्षांत मला एक विलक्षण व कचित् दृष्टीस पडणारा असा देखावा दिसला. तो देखावा मी मोठ्या उत्कंठेने पहात राहिलो. त्या