पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१९] खान्यांत घेऊन गेले. नंतर असिस्टंट एजंट्साहेब लाटसाहे. बांचा खलिता व किताबाचा चांद घेऊन आले. त्यांना महाराजसाहेब व एजंटसाहेब सामोरे जाऊन महाराणी जम- नाबाईसाहेब यांजकडे घेऊन गेले. तेथे गेल्यावर मेव्हिल साहेबांनी लेडी मेलव्हिल यांच्या हातून राणीसरकारचा चांद मासाहेबांना अर्पण केला. त्यासमयी राणीसरकारच्या खकि- त्याचे भाषांतर सर टी. माधवराव यांनी वाचून दाखविलें. त्याबद्दल मासाहेबांनी राणीसरकारचे आभार मानिले. त्या- वेळेस पुनः तोफांची सरबत्ती झाली. सर्व मंडळी मग थोरख्या दिवाणखान्यांत आल्यावर मेलव्हील साहेबांनी उभे राहून आलेला खलिता दरबारांत वाचून दाखविला. त्यावेळी सर्व मंडळी उभी राहिली होती. खलीत्याचा सारांश मरा- ठीत काजी शहाबुद्दीन यांनी सर्वांना कळविला. नंतर महा- राजसाहेबांनी इंग्रजीत थोडेसे भाषण केलें, तें असें:- ' मेल्व्हिल व इतर गृहस्थ हो, आजचा आमाला मोठा सुदिन प्राप्त झाला आहे. माझ्या परमपूज्य प्रिय मातु- श्रीसाहेबांना आज जे सन्मानचिन्ह मिळाले आहे ते एक मोठे बहुमोल भूषण आहे, असे आमच्या घराण्यांत नेहेमीं मानिले जाईल. गेल्या तीन वर्षांत आझाला जी मानचिन्हें मिळाली त्यांच्या योगाने आझी राणीसरकारच्या प्रेमषा- शाने पूर्वीपेक्षा अधिक बद्ध झालो आहो. ज्या ज्या वेळेत जरूर लागेल त्या त्या वेळेस दयाळु महाराणी व्हिक्टोरिया यांची सेवा परमभक्तीने करण्यास आली तयार आहो.