पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१७] होते. त्यावेळेस हिंदुस्थानातील सर्व राजकुलांतील स्त्रियां. मध्ये मासाहेब फार रूपवान आहेत असे सर्वांना कळले, मासाहेबांचे वय तेवीस वर्षांहून अधिक नव्हते व तारा- बाबाला सहावें सरून सातवें वर्ष लागले होते. यापूर्वी त्या पडद्यांत असल्यामुळे फारशा बाहेरच्या लोकांच्या दृष्टीस पडत नसत. नजीक असणाज्या लोकांच्या मात्र दृष्टीस पडत; यामुळे, त्यांच्या सौंदर्याची दूरच्या लोकांना फारशी कल्पना करता आली नव्हती. पढ़ें, दिल्लीहून निघाल्यावर मासाहेब आग्रयास गेल्या. तेथून मथुरा, गोकूळ, वृंदावन, ही पुराणप्रसिद्ध क्षेत्रे पाहून त्या प्रयागास गेल्या. तेथें तीन दिवस मुक्काम करून तीर्थविधी व दानधर्म सारून काशीस गेल्या. काशी क्षेत्रांत दहा दिवस वास करून तेथेही त्यांनी आपल्या नावलौकि- काप्रमाणे दानधर्म पुष्कळ केला. विद्वान् ब्राह्मणांची संभा- वना केली. याप्रमाणे उत्तरेकडची यात्रा संपवून त्या तारीख ५ फेब्रुवारी १८७७ रोजी बडोद्यास येऊन पोहोचल्या. FIE