पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१६] बारास पुत्रासह यावे, अशा मतलबाचा खलिता हिंदुस्थान सरकारांकडून मासाहेबांना आला. त्यावरून मासाहेब, तरुण गायकवाड सयाजीराव महाराज व कन्या ताराबाबा यांना बरोबर घेऊन, तारीख ७ डिसेंबर १८७६ रोजी बडोद्याहुन दिल्लीस जाण्याकरितां निघाल्या. समागमें मे. एजंट गव्हरनर जनरल मि. मेल्व्हिल्साहेब, सर टी, माधवराव व राज्यां- तील मोठमोठे सरदार, दरकदार, मानकरी व अधिकारी होते. या स्वारीबरोबर मोठाच लवाजमा घेतला होता. एकंदर १०७६ माणसें, १७२ घोडे, १० हत्ती, शिवाय उंट व बैलही पुष्कळ होते. तारीख १४ डिसेंबर रोजी मा- साहेबांची स्वारी दिल्लीस पोहोचली. तारीख २९ डिसेंबर रोजी कलकत्त्याच्या लाटसाहेबांनी तरुण गायकवाडाच्या छावणीत जाऊन परत भेट दिली. जातांना त्यांनी मा- साहेबांचीही भेट घेतली. तारीख १ जानेवारी १८७७ रोजी दिल्लीस टोलेजंग दरबार झाला. सर्व राजेरजवाड्यांसमक्ष सयाजीराव महाराज यांना विलायतच्या महाराणीसाहेबांनी लाटसाहेबांच्या हस्ते 'फर्जदे-खास-दौलते-इंग्लिशिआ' हा किताब व एक बावटा नजर केला. तारीख २ जानेवारी १८७७ रोजी ताराबाबाला समा- गर्भ घेऊन मासाहेबांनी व्हाइसरायांच्या पनि लेडी लिटन् यांची भेट घेतली, व त्यांनीही दुसऱ्या दिवशी मासाहे- बांना परत भेट दिली. दरबाराला आलेल्या सर्व राजेरजवाड्यांचे व राजस्त्रियांचे फोटोग्राफ घेण्यात आले. त्याचप्रमाणे मासाहेब व राजकन्या