पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

TET त्यांच्या पुढे नेलेल्या कामांचा योग्य दृष्टीने विचार करण्यांत त्या नेहमी तत्परता दाखवितात.' IST सर टी. माधवराव राज्यकारभार पाहूं लागले त्यावेळेस राज्यव्यवस्थेत बरेच घोटाळे होते, ते मोडून टाकून त्यांचे काम सुरळीत चालण्याच्या बाबतीत मासाहेबांकडून दिवा- णास जी मदत मिळत गेली त्यासंबंधाने सर टी. नी असें लिहून ठेविले आहे.-'राज्यकारभारांत योग्य फेरफार कर- ण्याच्या कामी महाराणीसाहेबांकडून आझांस पूर्ववत् साह्य मिळत आहे. राज्यकारभारांत सुधारणा झाली तर पुढे राज्याचे हित होणार आहे, ही गोष्ट त्यांच्या शहाणपणा- मुळे व सदसद्विवेकबुद्धिमुळे त्यांना कळून चुकली आहे. त्या निगृही व धोरणी असल्यामुळे त्यांचे आप्त, स्वकीय, मित्र, किंवा नोकर, यांना राज्यकारभारांत ढवळाढवळ कर- ण्यास फावत नाही. तरुण गायकवाडांच्या शिरावर पुढे मी जबाबदारी पडणार आहे ती नीटपणे बजाविण्यास ते तयार राहतील अशा त-हेचे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे. हैं नेहमी मासाहेबांच्या हृदयांत घोळत असते. तसेंच श्रेष्ठ प्रेरक शक्तीचा राज्यकारभारांत जरी कदाचित् योग्य उप- योग झाला नाही, तरी राज्यरूपी यंत्राची रचना सर्व गोष्टी पुढे सुरळित चालतील अशा घाटाची करून ठेविण्या- विषयी त्यांची उत्कट इच्छा आहे.' अशा रीतीने बडोद्याचा राज्यकारभार चालत असतां, सन् १८७७ च्या जानेवारीच्या पहिले तारखेस विलायतच्या महाराणी विक्टोरिया ह्या दिल्ली येथे हिंदुस्थानच्या सार्वभौम बादशाहिणीचा किताब धारण करणार, त्या समयीं ह्या दर.