पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[४] साहेच फार बुद्धिमान व धोरणी असल्यामुळे बडोद्याच्या भावी राज्यकर्त्याला चांगले शिक्षण देणे अत्यंत महत्वाचे आहे, हे त्या पूर्णपणे जाणून आहेत, ही मोठ्या सुदैवाची गोष्ट होय.' पुनः ते दुसरे ठिकाणी ह्मणतात- तरुण गायकवाडांच्या शारीरिक व नैतिक शिक्षणावर महाराणीसा- हेबांची देखरेख पूर्ववत् चांगली आहे. तसेच कारभारी मं. डळीला कारभाराचे काम सुयंत्रपणे चालविण्यास त्यांचे चांगले पाठबळ आहे. हल्ली त्यांच्या देखरेखीखाली जी खाती आहेत त्यांच्या खर्चाचा प्रश्न त्यांच्या पुढे भालेला आहे. अशा वेळी त्यांच्याहातून शहाणपणाने योग्य काटकसर होईल अशी आह्मास उमेद आहे.' राज्यकारभारांत नवीन शिस्त घालून देण्याच्या कामी मासाहेबांनी सर टी. माधवराव यांस जी मदत केली तिज- बद्दल त्यांनी पुढे लिहिल्याप्रमाणे उल्लेख केला आहे-'आ- मच्या कारभारांतील तत्वे आणि त्यांची अंमलबजावणी महा- राणीसाहेबांस पसंत पडल्यामुळे आझाला मोठी उमेद आली आहे. त्यांची बुद्धिमता, शहाणपण आणि सौजन्य कोण. त्याही देशी संस्थानिक राजाला, किंवा राणीला शोभण्या- सारखी आहेत.' मि. मेलन्हिलसाहेब, एजंट् गन्हरनर जनरल, सी. आय, ई., यांनी हिंदुस्थान सरकारास सन् १८७५-७६ सालचा वार्षिक रिपोर्ट केला. त्यांत त्यांनी झटलें आहे की-'महाराणी जमनाबाईसाहेब यांचे शहाणपण, प्रेमळ विचार, आणि साह्यतत्परता, या गुणांची राज्यकारभारांत अत्यंत मदत झाली आहे. त्यांच्या सल्लामसलतीकरितां