पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११] Farm दिल्लीचा बडा दरबार. । सयाजीराव महाराजांचें दत्तविधान होतांच राज्यक- ल्ला आवश्यक शिक्षण देण्याचा बोजा मासाहेब व त्यांचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या शिरी पडला. पुत्राच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था लावून राज्यकारभार सुयंत्र चा. लण्याच्या कामी दिवाणास योग्य सल्लामसलत देण्याचा भारही मासाहेबांवर पडला; पण, ही दोन्ही कामें त्यानी सुरेख रीतीने पार पाडली. मि. ईलीअटूसाहेब यांची योजना राजपुत्राच्या शिक्ष. णाच्या कामावर झाली. त्यांच्या देखरेखीखाली सयाजीराव यांचा मराठी, इंग्रजी व गुजराथी भाषांचा अभ्यास झाला. त्यांची बद्धि तरतरीत असल्यामुळे सर्व विषयांत लवकरच त्यांना बरीच प्रवीणता येत चालली. तरुण गायकवाडांच्या शिक्षणाविषयी लिहितांना सर टी. माधवराव व त्या वेळचे एजंट्साहेब यानी आपल्या सन् १८७५-७६ च्या रिपोर्टात मासाहेबांच्या दक्षतेविषयी असे लिहून ठेविलें आहे:- सर टी. माधवराव ह्मणतात-'महाराजांच्या शिक्षणासंबं. धाने महाराणी जमनाबाईसाहेब अत्यंत काळजी घेतात. हे त्यांना फार भूषणावह आहे. त्यांच्या शिक्षणाच्या ज्या सोई त्यांनी करून दिल्या, त्याहून जास्त चांगल्या सोई कोण. स्याही देशी संस्थानांत आढळावयाच्या नाहीत. महाराणी-