पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारीख २१ नोव्हेंबर रोजी रात्री मोतीबाग बंगल्यांत प्रिन्सूसाहेबांचा बडा खाना झाला. नंतर मंडळीसह ते राजवाड्यांत मासाहेबांच्या भेटीस गेले. खंडेराव महाराजांनी एक घागरी पलटण तयार केली होती. ती पलटण सलामी. करितां राजवाड्यापुढे उभी केली होती. सलामी होऊन वर गेल्यावर तेथेही कॉफीची व फलाहाराची तजबीज ठे. विली होती. फलाहार झाल्यावर नाच, रंग, जलतरंग, गायन, वगैरे समारंभ झाला. दारूकामही फार चांगलें सुटलें. तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजण्याचा सुमार झाला होता. नंतर प्रिन्ससाहेब मासाहेबांच्या दिवाणखान्यांत भेटीस गेले. तेव्हां ते मासाहेबांना ह्मणाले-'आपल्पा आगत- स्वागताने मी फार खुष झालो. बडोद्याच्या पाहुणचाराचे मला निरंतर स्मरण राहील. अगडांतील साठमान्यांचे खेळ पाहून मला फार संतोष झाला' वगैरे भाषण ऐकून मासा- हेब खुष झाल्या. नंतर प्रिन्ससाहेबांना पोहोचविण्याकरिता त्या खालच्या मजल्यापर्यंत गेल्या होत्या. ही त्यांची व प्रिन्स्- साहेबांची बडोद्यास तिसरी भेट झाली. • याप्रमाणे मेजबान्या, नाच, आतसबाज्या, दरबार, भाषणे, शिकार, बगैरे आगतस्वागताचे सर्व शिष्टाचार व पाहुणचार घेऊन पाच दिवसांनी, झणजे तारीख २३ नोव्हेंबर रोजी, युवराज प्रिन्स् ऑफ वेल्स् यांची स्वारी रात्रीच्या गाडीने मुंबईकडे चालती झाली. ही माहिती प्रिन्स् ऑफ वेल्स् यांचे 'प्रवासवर्णन' या नांवाच्या पुस्तकांतून घेतली आहे. fopace