पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[४०] घेऊन गेले. तेथें सर्वांचे नजराणे झाले. हार, तुरे, गजरे, पानसुपारी झाली. नंतर प्रिन्स्साहेब मासाहेब बसंख्या होत्या त्या दिवाणखान्यांत त्यांच्या भेटीस गेले. तेथे क्षेम- कुशलतेचे भाषण होऊन प्रिन्स्साहेब आपल्या मुक्कामावर गेले. ही बडोयांत मासाहेबांची व त्यांची पहिली भेट झाली. दुसरी भेट झाली तिजबद्दल रसेलसाहेबांनी युवराजांच्या प्रवास वर्णनांत हकीकत दिली आहे ती अशी:- 'जमनाबाईसाहेबांचे लावण्य अप्रतिम आहे. त्यांचे वय तेविशीच्या आंतच आहे. त्यांचा हासतमुख चेहरा असून डोळे पाणीदार आहेत. हातापायांची ठेवण सुरेख आहे. बो. टांत अंगठ्या घातल्या होत्या. पायांत सोन्याचे तोडे व जोडवीं होती. त्यांच्या भाराने चालतांना त्यांना बरेच श्रम होत अस- तील. प्रिन्ससाहेबांची व त्यांची भेट झाली त्यावेळेस पडदा नव्हता, व तोंडावर बुरखाही नव्हता, खुल्यो रीतीने कोंचाच्या बैठकीवर त्या बसल्या होत्या. अंगाबर एक बारीक शाक होती. ती त्या वरचेवर सांवरून घेत होत्या. ताराबा. बाला त्यानी आपल्या मांडीवर घेतले होते. तिजकडे बोट करून त्या ह्मणाल्या-'ही माझी तारा पुरुषाच्या जन्माला आली असती तर आज तीच गायकवाडांच्या गादीची बारस झाली असती. मुंबई शहर पाहून मला फार आनंद झाला. भामचे बडोदें आपल्याला आवडेल अशी आशा करिते. आपल्या शिकारीचा बंदोबस्त करून ठेविका आहे.' 1 इतके भाषण झाल्यावर युवराज मासाहेबांचा निरोप घेऊन साठमारीचे खेळ पाहण्यासाठी अगडाकडे निघून गेले. ही मासाहेबांची व त्यांची बडोद्यास दुसरी भेट झाली. राम