पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३९] राजेलोकांनी केले. कित्येकांनी प्रिन्ससाहेबांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने इस्पितळे, वगैरे इमारती बांधण्यासाठी काही रकमा निराळ्या काढून ठेविल्या. MERRIES गायकवाडांनी मद्रास येथे बनविलेली एक चांदीची सुरेख चाहादाणी व रेशमाने गुंफलेल्या ढाला नजर केल्या.' मासाहेबांनी आपल्या जवाहीर खान्यापैकी दोन जुने अकं. कार युवराजांच्या पत्नीस देण्याकरितां नजर केले. एक मौल्यवान मोत्यांचा हार, (यांतील मोत्यांचा रंग व घाट फारच वर्णनीय असून त्यांत हिरेही जडलेले होते) दुसरा दागीना स्त्रियांनी गळ्यांत घालण्याचा जडावाचा कंठा, हे दोन्ही अलंकार गायकवाड घराण्यातील बऱ्याच राण्यांनी वापरले होते. प्रिन्ससाहेबांना एकंदर ४०० हून अधिक नजराणे आले. पुढे प्रिन्सूसाहेबांची स्वारी बडोद्यास येण्याचे ठरलें; यामुळे, मासाहेबांना फारच समाधान वाटलें, मग त्या तारीख १८ नोव्हेंबर रोजी बडोद्यास परत आल्या. दुस- याच दिवशी, मणजे तारीख १९ नोव्हेंबर रोजी, प्रिन्स. साहेब यूरोपियन् मंडळीसह बडोद्यास आले. स्टेशनावर मासाहेबांनी आपले चिरंजीव सयानीराव महाराज, सर टी. माधवराव, दरकदार, सरदार, मानकरी, मुलकी व लष्करी भधिकारी सामोरे पाठविले होते. मि. मेलव्हिल्साहेब एजंटही स्टेशनावर हामर होते. त्या सर्वांचे आदरातिथ्य मासाहेबांनी सर टी. कडून उत्तम प्रकारचे करविलें. प्रिन्ससाहेबांकरिता राजवाड्यांत मोठा दरबार भरविला. सयाजीराव महाराज सामोरे जाऊन प्रिन्स्साहेबांना वरच्या दिवाणखान्यांत