पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बर १८७५ रोजी युवराज मुंबईस येऊन दाखल झालं. त्यांच्या व सयाजीरावांच्या शिरस्त्याप्रमाणे भेटी व परत भेटी झाल्या. परस्परांचे भागत स्वागत चांगल्या प्रकारचे झाले. तो समारंभ मोठा भव्य व प्रेक्षणीय होता. प्रिन्स्- साहेबांच्या आगमनानिमित्त मुंबई शहरांत अप्रतिम रोष- नाई झाली. आतसबाजीचे कामही अजब रीतीचें सुटले, मुंबईस मासाहेबांचा पंचवीस दिवस मुक्काम होता, तोपर्यंत मुंबईच्या गव्हरनरांनी त्यांचा व बरोबरच्या मानकरी मंड- ळींचा मान मरातब फार चांगला ठेविला होता. मुंबईस प्रिन्ससाहेबांना बडा खाना झाला. त्या वेळेस ते ह्मणाले-'हिंदुस्थान देश पाहण्याचे माझ्या मनांत फार वर्षांपासून होते, ते स्वप्न आज खरे ठरले.' __ तारीख १० नवंबर रोजी प्रिन्ससाहेब गायकवाडांच्या भेटीस त्यांच्या मुक्कामी आले होते. बैठकीची जागा वरच्या मजल्यावर केली होती. भेटीची वेळ संध्याकाळची असल्यामुळे रोषनाई उत्तम प्रकारची करण्यांत आली होती. सयाजीरावांशी बरेंच भाषण झाल्यावर त्यांनी मासाहेबांची ही निराळी भेट घेतली. त्यांजकडे काही वेळ बसून प्रिन्स्.. साहेब परळच्या बंगल्यावर परत गेले. मुंबईस राजेरजवाडे आले होते, त्यांचे नजर नजराणे तारीख १७ नवंबर १८७५ रोजी झाले. जरीचे, रेशमाचे, व सताचे मौल्यवान कपडे, मौल्यवान हत्यारे, जडजवा- हीर, सोने, रुपें व दुसऱ्या धातूंचे कलाकुशलतेचे पदार्थ, तलवारा, कट्यारी, सतरंज्या, वैगेरे नजराणे कोल्हापुरचे महाराज, कच्छचे राव, हैद्राबादचे निजामसाहेब इत्यादि