पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३७] खंड १०. SEE POSE यवराज प्रिनम् ऑफ वेल्स. 15 प्रिन्स्साहेबांच्या भेटीसाठी मासाहेब मुंबईस गेल्याचे मागे कळविले. त्यांचा मुक्काम मलबार हिलवर एका वि. स्तीर्ण बंगल्यांत होता. ही मुंबई सुमारे १०० वर्षांपूर्वी कोणाला विशेष माहीत नाही असें एक लहानसें बेट होतें.. तें पोटुगीझ लोकांनी व्यापाराकरितां पेशव्यांकडून मागून घेतले होते. पुढे ते पोर्तुगाल देशच्या राजाने आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस आपला जांबई इंग्लंडचा राजा याला आंदण दिले होते. नंतर इंग्रज राष्ट्राच्या कारकी- र्दीत तें नांवारूपाला आले. अशी मुंबईची पूर्व पीठिका. आहे. कोणाची मुंबई, कोणाला, कोण आंदण देतो; याचा विचार केला झणजे मन चकित होते. गुलिस्तानचा कर्ता शेखसादी याने झटले आहे की- 'दुनियेकी मज्जा हरदम चली है, अफसोस यही हैं के, एक दिन हम न ही है.' (झणजे दुनयेतील मजा नेहमी चालूच आहेत; पण, दुःखाची गोष्ट एवढीच की आह्मी मात्र एक दिवस नाहींसें होणार,) असो. युवराजांच्या स्वागतासाठी कलकत्याचे लाटसाहेबही मुंबईस आले होते. त्यांच्या व मासाहेब आणि सयाजीराव यांच्या तेथें प्रथमच मुलाकती झाल्या. पुढे तारीख ९ नोव्हें-