पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३६] रिपोर्टीत दिली आहे. बरोबरच्या काही दरकदार वगैरे लोकांनी यापूर्वी मुंबई शहर मुळीच पाहिले नव्हते. त्यांनी ते गजबजलेलें व माणसांनी फुललेले शहर पाहून ते माश्चर्याने चकित झाले. एकदां मासाहेब जाहजांत ब- सून मुंबई जवळची घारापुरीची कोरीव लेणी पाहावयास गेल्या. त्या वेळेस दरकदार व मानकरी मंडळीही बरोबर होती. ती केणी यापूर्वी त्यांनी कधी पाहिली नव्हती. ती कशासाठी, कोणी केली, हे त्यांस कळेना. त्या लेण्यांचे शिल्पपाटव पाहून सर्वांची मती गुंग होऊन गेली. वेरूळ व कान्हेरीची अद्भुत लेणी ते पाहाते तर किती आश्चर्यात बुडाले असते कोण जाणे? तेथील भव्य व विशाल सभा. मंडप व स्थूल शिलास्तंभ फारच वर्णनीय व प्रेक्षणीय आहेत. असो. मासाहेब व सयाजीराव महाराज मुंबईचे कारखाने, इमारती व बागबगीचे पहावयास निघाले झणजे दरकदार, वगैरे मंडळी बरोबर असावयाचीच. शहरांतीक उंच उंच हवेल्या, सुंदर इमारती, जागोजागचे चित्र विचित्र व रम- णीय बाग, विस्तीर्ण व स्वच्छ रस्ते, कापडाच्या गिरण्या, लोखंडाचे व आगगाडीचे अवाढव्य कारखाने, घोडे जोड- लेल्या धावणाऱ्या ऑमनीबस् गाड्या, सुशोभित दुकाने व त्यांतील पदार्थांची उत्कृष्ट मांडणी, रस्त्याने जात येत असलेल्या गाड्या घोड्यांची गर्दी, धंदे व उद्योग, हे प्रकार पाहून त्यावेळी सर्वांना मोठे आश्चर्य व धन्यता वाटली. का