पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजाने, सन् १७२१ साली, 'समशेरबहादर' हा किताब दिला. गायकवाड सरकारची गादी स्थापन होऊन आज- च्या मित्तीला सुमारे १८० वर्षे झाली. सयाजीराव या नांवाचे यापूर्वी दोन पुरुष होऊन गेले. पहिले सयाजी- राव यांनी सन् १७७१ ते १७७८ पर्यंत सात वर्षे राज्य केले. त्यांना सन् १७७१ साली सेनाखासखेल' हा किताब सातारच्या राजाकडून मिळाला. तेव्हां- पासून त्यांच्या नांवाला सेनाखासखेल समशेर बहा- दर' हा किताब कागदोपत्री लागू लागला. दुसरे सयाजी- राव, झणजे प्रस्तुतच्या महाराजांचे आजे, यांनी सन् १८१९ ते १८४७ पर्यंत २८ वर्षे मोठ्या नेकीने राज्य केलें; आणि मासाहेबांनी दत्तक घेतलेले तिसरे सयाजीराव महाराज हल्ली राज्य करीत आहेत. याप्रमाणे 'सयाजी' हे नांव धारण करणारे आजपर्यंत तीन पुरुष गादीवर बसले. दत्तविधानाच्या वेळेस सर रिचर्ड मीड् हे एजंट, गव्ह. रनर जनरल, होते. ते जाऊन ता. १६ नोव्हेंबर १८७६ मे रोजी मि. मेलव्हिल साहेब एजंट होऊन आले. नापुढे थोडक्याच दिवसांनी विलायतच्या विक्टोरिया. राणी यांचे ज्येष्ट पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स् मुंबईस येणार असें वर्तमान कळले, तेव्हां जमनाबाई साहेब त्यांच्या भेटी. साठी मोठा लवाजमा बरोबर घेऊन आपल्या पुत्रासह तारीख २४ आक्टोबर १८७५ रोजी बडोद्याहून मुंबईस गेल्याबरोबर दिवाण सर टी. माधवराव, वगैरे बडे बडे काम. दार, दरकदार, सरदार व मानकरी मंडळही नेले होते. या मुंबईच्या स्वारीची हकीकत, सर टी नी आपल्या वार्षिक