पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३४] झाली होती ती राज्याभिषेक झाल्यावर नाहीशी झाली. आता गायकवाडांच्या गादीवर बसलेल्या पुरुषांचा व काशीराव दादा गायकवाड यांच्या वंशाचा थोडासा इतिहास देतों- गायकवाड घराण्याचा वंशवृक्ष बडोदा 'ग्याझेटियर' व • रूलर्स ऑफ बडोदा' या पुस्तकांत दिला आहे. शिवाय, एक वंशवृक्ष ऐन्याच्या चौकटीत बसवून श्री सयाजी लायब्ररीत मधल्या दिवाणखान्यांत लावून ठेविला आहे. तो पाहिला असतां या जुन्या वृक्षाची काशीराव शाखा अलीकडे खंडेराव शाखेत मिसळून जाऊन तिका नवीन पालवी फुटून जोमात येत चालल्याचे दिसून येईल. पिलाजीराव गायकवाडांचे पुत्र प्रतापराव, यांचे वंशज कालगतीने कवळाणे गांवी रहात होते. त्यांचेच वंशिक काशीराव दादा हे होत. गायकवाडांच्या गादीवर आजपर्यंत- १ दमाजी. (पहिला) २ पिलाजी. ३ दमाजी. (दुसरा) ४ गोविंदराव. ( पहिला) ५ सयाजीराव. ( पहिला) ६ फत्तेसिंग. ( पहिला) ७ मानाजी. गोविंदराव. (दुसरा) ९ आनंदराव. १० फत्तेसिंग. (दुसरा) ११ सयाजीराव. (दुसरा) १२ गणपतराव, १३ खंडेराव. १४ मल्हारराव, BE१५ सयाजीराव (तिसरा). असे पंधरा पुरुष बसले. प्रस्तुतचे सयाजीराव हे पंध- राबे पुरुष आहेत. पहिले दमाजीराव गायकवाड यांस शाहू