पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

THORARY.KHE GENERALI सार्वजानेकपाचनालय दत्तविधान. Presen- खानदेश जिल्ह्यापैकी कवळाणे गांवीं काशीराव दादा गायकवाड रहात होते. ते त्यावेळेस गरीब स्थितीत होते. त्यांना आनंदराव, गोपाळराव व संपतराव असे तिघे मुलगे होते. त्यांना मासाहेबानी पाहण्यासाठी एजंटसाहेबांच्या मार्फत बडोद्यास नोलाविले. तमी 'बडोद्यास कशाला आला आहां?' असें तिघांना एका थोर गृहस्थाने विचारले. त्याला थोरले आनंदराब यांनी काहीच उत्तर दिले नाही. संपतराव ह्मणाले, मला माहीत नाही. मधले गोपाळराव यांनी चटदिशी उत्तर दिले-मी रामा होण्यासाठी आलो आहे. हाच मुलगा सर्वांमध्ये चलाख व धर्त दिसला. त्याच्या तोंडांतून जी अक्षरें निघाली तीच पुढे खरी ठरली. मासाहेब व सर रिचर्ड मीड् यांना तोच मुलगा पसंत पडला. त्याचे वय त्यावेळेस सुमारे १३ वर्षांचे हाते. या मुलाला मासाहेबांनी तीन वेळां पहावयास बोलविलें होतें. नंतर गोपाळरावालाच मांडीवर घेण्याचे त्यांनी ठरविले. मुलाची निवड झाल्यावर दत्तविधान रीतीप्रमाणे होऊन तारखि २७ मे १८७९, गुरुवार, या दिवशी मोठ्या समा- रंभाने पट्टाभिषेक झाला. मुलाचे नांव गोपाळराव होते ते बदलून 'सयाजीराव ' असें ठेविले. मल्हारराव महाराज यांस मद्रासेकडे नेल्यावर बडोदेंराज्यांत बरीच अस्वस्थता