पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंडेराव महाराजांनी सन् १८५७ च्या बंडाच्या साली इंद्रजसरकाराला उत्तम मदत केली होती, व कांही चळ- वळ न करता त्यांनी दोस्तीचे नाते कायम ठेविलें, ह्मणून सन् १८६२ साली त्यांना राणीसरकाराकडून एक सनद मिळाली, तीत त्यांना दत्तक घेण्याची परवानगी दिली होती. गादी रिकामी पडल्यावर सार्वभौमसरकाराला त्या सनदेचे स्मरण झाले. महाराणी जमनाबाईसाहेब यावेळी पुण्यास राहात होत्या. त्यांच्या मांडीवर मुलगा दत्तक देऊन बडोद्याचे राज्य चालवावे, असा विलायतसरकार व हिंदुस्थानसर- कार यांचा विचार ठरला. मग तिकडून सूचना मिळतांच मासाहेब पुण्याहून ता. ३ मे १८७५ रोजी बडोद्यास येऊन त्यांनी मोठ्या समारंभाने राजवाड्यांत प्रवेश केला. होळकर सरकारचे दिवाण सर टी, माधवराव यांस इंग्रज- सरकाराने मागून घेऊन सगळ्या बडोदें राज्याची कुल- मुखत्यारी देऊन त्यांना दिवाण नेमिले. त्याप्रमाणे त्यांनी दिवाणगिरीचा चार्ज तारीख १० मे १८७५ रोजी घेतला. दिवाणगिरीची वस्त्रे तारीख १६ मे १८७५ रोजी मि. ळाली. नंतर दत्तकाची निवड करण्याचे नाजूक काम मासाहेबांकडे आले. बडोद्यास गायकवाडांच्या वंशापैकी कांहीं कुमार होते, शिवाय काही कुमार नाशिक, खानदेश, बगैरे जिल्ह्यांतही होते. पुढे दूरवर दृष्टी पोंचवून मुलगा निवडण्याचे अवघड काम त्यांनी किती धूर्ततेनें, धोरणाने व कुशलतेने पार पाडले, हे आतां पुढच्या खंडांत सांगू.