पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जसे प्रकाशित व्हावयास पाहिजेत तसे झाले नाहीत, असे मोठ्या दुःखाने ह्मणावे लागते. अशी चरित्रे प्रसिद्ध झाल्यावांचून महाराष्ट्र- स्त्रियांची खरी योग्यता कधीही व्यक्त होणार नाही, व त्यांच्या राज- कारणचातुर्य, शौर्य, तेजस्विता, स्वाभिमान, पातिव्रत्य इत्यादि मूल्य- वान् गुणांचे खरें तेज कधीही प्रकाशित होणार नाही. आजपर्यंत सुप्रसिद्ध महाराष्ट्रस्त्रियांपैकी कीर्तिशालिनी महासाध्वी राणी अहिल्याबाई होळकर व झांशीची रणशूर राणी लक्ष्मीबाई ह्या दोन स्त्रियांची चरित्रे काय ती मराठी भाषेत प्रसिद्ध झाली आ- हेत. परंतु ह्याशिवाय अनेक चरित्रवर्णनयोग्य अशा प्रख्यात स्त्रिया इतिहासाच्या अभावामुळे गाढ अंधःकारांत लपून गेल्या आहेत ! त्यांची चरित्रं प्रसिद्ध करून, त्यांच्या अंगच्या अद्वितीय गुणांना कीर्तिमंदिरांत चिरप्रकाशित करून ठेवणे हे काम एतद्देशीय ग्रंथकारांचे आहे. परंतु इकडे त्यांचे लक्ष जितकें जावें तितकें जात नाही, ही शोचनीय गाष्ट हाय! 'अकरणान्मंदकरणश्रयः' ह्या न्यायाने अल्पसा प्रयत्न होत आहे किंवा झाला आहे, तेवढ्यावर समाधान मानून स्वस्थ बसणे कधीही रास्त होणार नाही. इंग्लंडांतील विविधगुणसंपन्न स्त्रि- यांच्या चरित्रमाला झपाट्याने प्रसिद्ध होत आहेत. एवढेच नव्हे तर तेथील इतिहासप्रसिद्ध वीरमाता व वीरपत्न्या ह्यादेखील तद्देशीय चरित्र- लेखकांच्या प्रयत्नानें कीर्तीच्या अढळ मंदिरांत विराजित झाल्या आहेत. परंत आमच्या इकडे त्या मानाने पाहिले तर अगदी उलट प्रकार आहे ! अहिल्याबाई होळकर हिच्यासारखी लोकोत्तर स्त्री सर्व जगाच्या इतिहासांत एक देखील सांपडणे कठीण; परंतु तिचे साद्यंत, साधार व सविस्तर चरित्र अद्यापि मराठी भाषेत प्रसिद्ध झाले नाही ! सर जॉन मालकम ह्या परदेशीय ग्रंथकाराने ह्या स्त्रीची थोडीबहुत माहिती "मध्य हिंदुस्थानच्या इतिहासांत" लिहून ठेविली आहे. तिच्या आधारे हिंदुस्थान कथारस' वगैरे मराठी पुस्तकांत तिचा अल्पसा वृत्तांत प्रसिद्ध झाला आहे, व चारपांच वर्षापूर्वी 'केसरी'धनु- र्धारी व पुण्याचे रा. देव ह्यांनी तिची दोन स्वतंत्र चरित्रे प्रसिद्ध