पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

CENERALLER जनिक यान्वयलय Pan खेड, (पुणे.) - - ८ उपोद्घात.ly . महाराष्ट्रस्त्रियांच्या चरित्रांबद्दल दोन शब्द. सर मॉनियर उइल्यम्स ह्यांनी इ. स. १८८३ मध्ये हिंदुस्थानां- तील चरित्रग्रंथासंबंधाने लिहितांना एके ठिकाणी असे लिहिले आहे की, “हिंदुस्थानांतील प्रख्यात पुरुषांची चरित्र अद्यापि लिहिली गेली नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे ! हिंदु अथवा मुसलमान लोक ह्यांना अशा चरित्रग्रंथाची गोडी आहे असे दिसत नाही!" हे उद्गार सा- हेबबहादुरांनी काढल्यास आज सतरा वर्षे होऊन गेली. तितक्या अवधीत ही स्थिति पालटली जाउन, हिंदु व मुसलमान ह्या दोन्ही जाती- तील विद्वान लोकांचे लक्ष कमजास्त प्रमाणाने प्रसिद्ध पुरुषांच्या चरित्र- लेखनाकडे लागत चालले आहे, असें ह्मणण्यास हरकत नाही. एत- द्देशीय भाषेमध्ये ह्या सतरा वर्षांत पुष्कळ चरित्रग्रंथ निर्माण झाले असून, तो क्रम पुढे जोराने चालू आहे, ही संतोषाची गोष्ट होय. प्रसिद्ध व कीर्तिमान पुरुषांच्या चरित्रांकडे ज्याप्रमाणे एतद्देशीय ग्रंथ- कारांचे लक्ष लागले आहे, त्याप्रमाणे हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध स्त्रि- यांच्या चरित्रप्रकाशनासंबंधानेही त्यांचा अल्पसा प्रयत्न चालू आहे. इंग्रजीभाषेमध्ये काही विद्वान युरोपियन ग्रंथकारांनी हिंदुस्थानांतील हतिहासप्रसिद्ध अर्वाचीन व प्राचीन स्त्रियांची चरित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यांच्या आधाराने एतद्देशीय भाषेत स्त्रीचरित्रग्रंथ थोडे थोडे तयार होऊ लागले आहेत, ही समाधानाची गोष्ट होय. बंगाली ग्रंथ- कार बाबू मन्मथनाथ दत्त ह्यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या आधारें "भारत- वर्षीय युवतिरक्षमाला" नामक एक चांगला ग्रंथ मराठी भाषेत कांह महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला आहे, व तो सशिक्षित स्त्रीपरुषांस वाचना- भिरुचि उत्पन्न करण्यास अंशतः कारण होईल अशी आशा आहे. तथापि, रणशूर, राजकारणी, नीतिसंपन्न व सगुणी अशा खुद्द महा- राष्ट्रस्त्रियांची चरित्रे अद्यापि महाराष्ट्रवाचकांस चांगलीशी उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रस्त्रियांचे अलौकिक गुण चरित्ररूपाने